शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: November 23, 2015 02:40 IST

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची प्रगती व उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड नाही.

मुख्यमंत्री : माळी समाजाचा युवक-युवती परिचय मेळावानागपूर : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची प्रगती व उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड नाही. खऱ्या अर्थाने त्यांना भारतरत्न मिळणे हा भारतरत्न पदाचा सन्मान होय. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे, अध्यक्ष संभाजी पगारे, प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, फुले दाम्पत्याला योग्य वेळी त्यांना हा सन्मान सरकारकडून देण्यात येईल. यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. फुले यांच्या विचारावर आमचे शासन काम करते. त्यांच्या आदर्शाचा आधार घेऊ न दीनदलित, शोषित-पीडित यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच माळी समाजाचे राज्यात चांगले संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजाकरिता दिशादर्शक उपक्रम राबविला जात आहे. यावेळी अविनाश ठाकरे, संभाजी पगारे, शंकरराव लिंगे, शहर कार्याध्यक्ष गोविंद वैरागडे व कार्याध्यक्ष ज्ञानेशवर लोखंडे आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात विविध प्रस्ताव पारित करून फुले दाम्पत्याला भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. वधू-वर सूचक मेळाव्यात ५५० युवक-युवतींनी नोंदणी के ली होती. यातील ३०० जणांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गिरडकर, शहर सरचिटणीस कैलास जामगडे आदी मान्यवर उपस्थित होेते. या मेळाव्याला युवक-युवती व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. संचालन प्रा. कविता भोपळे यांनी तर आभार मधुसूदन देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)