शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
5
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
6
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
7
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
8
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
9
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
10
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
12
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
13
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
14
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
15
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
16
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
17
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
18
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
19
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
20
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटच्या वादातून महिलेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST

नागपूर : फ्लॅटवर ताबा घेण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तींनी विधवा महिला व तिच्या मुलांना मारहाण केली. फ्लॅटमध्ये तोडफोड करून हंगामा घातल्याची ...

नागपूर : फ्लॅटवर ताबा घेण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तींनी विधवा महिला व तिच्या मुलांना मारहाण केली. फ्लॅटमध्ये तोडफोड करून हंगामा घातल्याची घटना गिट्टीखदानच्या फ्रेंड्स कॉलनीत घडली. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

नलिनी तायवाडे (५७) या मुलगा आणि मुलीसोबत बोरनालाच्या आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. नलिनी यांच्या दिराने काही दिवसांपूर्वी बॉंड पेपरवर फ्लॅटची अंकुश डाखोरेला विक्री केली आहे. डाखोरे बुधवारी पत्नी रूपाली डाखोरे आणि कुटुंबीयांसह अपार्टमेंटमध्ये पोहोचला. नलिनीला फ्लॅट आपल्या मालकीचा असल्यामुळे फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. नलिनीने नकार दिल्यामुळे डाखोरे आणि त्याचे कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी नलिनी आणि तिच्या मुलांना मारहाण केली. हातोडी आणि विटांनी फ्लॅटचे दरवाजे-खिडक्या तोडल्या. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी डाखोरे दाम्पत्यासह विमल अजाबराव चकोले, बल्ली ऊर्फ रचना बनवारी, रेखा शेखर अर्जितवार, इंदूबाई मनोहर महाजन, दुर्गाबाई रामेश्वर करनाके, सोनू राजेश वऱ्हेकर, अन्नू दिलीप मेश्राम यांच्याविरुद्ध दंगा, मारपीट, धमकी देणे तसेच फ्लॅटवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.