शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सहायक फौजदार अडकला

By admin | Updated: May 14, 2016 03:07 IST

मारुती कार चालकाकडून १५०० रुपयांची लाच उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराला (एएसआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाने जेरबंद केले.

१५०० रुपयांची लाच : एसीबीची कारवाई नागपूर : मारुती कार चालकाकडून १५०० रुपयांची लाच उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या सहायक फौजदाराला (एएसआय) भ्रष्टाचार विरोधी पथकाने जेरबंद केले. प्रकाश दमडूजी राठोड (वय ४८) असे त्याचे नाव आहे. तो इंदोरा भागात कार्यरत होता. तक्रारकर्ते ९ मे रोजी लग्नाकरिता भंडारा येथून आपली मारुती ओम्नी कारने नागपुरात आले होते. पारडी नाक्याजवळ वाहतूक पोलिसांनी कारचालकावर चलान कारवाई केली. ही कार ताब्यात ठेवून कोर्टात दंड भरण्यास सांगितले. त्यावरून तक्रारकर्त्याने न्यायालयात एक हजार रुपये दंड भरला आणि त्याची पावती घेऊन ११ मे रोजी वाहतूक शाखेच्या इंदोरा कार्यालयात कार सोडविण्याकरिता गेले. तेथे कार्यरत असलेले एएसआय राठोड यांनी दंड भरल्याची पावती पाहिली. मात्र कार सोडण्याकरिता दोन हजारांची मागणी केली. नकार दिल्यामुळे राठोडने मारुती ओम्नी कारवर निलंबन नोटीस लिहिला. त्यावर सहायक पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी घेऊन तक्रारदारास मेमो दिला. परिणामी तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील कार्यालयात १२ मे रोजी तक्रार नोंदवली. पोलीस उपायुक्त संजय दराडे, अतिरिक्त अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या नेतृत्वात कारवाईचा सापळा रचण्यात आला. (प्रतिनिधी)भंडाऱ्याचे पथक नागपुरात कारवाईसाठी भंडारा एसीबीचे पथक नागपुरात पोहचले. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने राठोडला गाठून लाचेची रक्कम कमी करण्याची मागणी केली. त्याने १५०० रुपये घेण्याची तयारी दाखवली. ही रक्कम स्वीकारताच पोलीस उपअधिक्षक दिनकर सावरकर, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, हवलदार बाजीराव चिंधालोरे, नायक अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुध््दे , अश्विनकुमार गोस्वामी यांनी राठोडच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.