माय-लेकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:01+5:302021-05-05T04:11:01+5:30

दोघेही जबर जखमी : हल्ल्यात अल्पवयीन आरोपींचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुन्या वादाचे उट्टे फेडण्यासाठी दोन अल्पवयीन ...

Assault on My-Lake | माय-लेकावर प्राणघातक हल्ला

माय-लेकावर प्राणघातक हल्ला

दोघेही जबर जखमी : हल्ल्यात अल्पवयीन आरोपींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जुन्या वादाचे उट्टे फेडण्यासाठी दोन अल्पवयीन आरोपींसह चौघांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला चढवला. त्याची आई त्याला वाचविण्यासाठी धावली असता आरोपींनी तिच्यावरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात मायलेक दोघेही जबर जखमी झाले. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली.

फिर्यादी महिला देविका ज्ञानेश्वर कळंबे (वय ४५) त्यांचे पती ज्ञानेश्वर कळंबे (वय ५०) तसेच त्यांचा मानलेला मुलगा राहुल गावकर आणि अंकित ऊर्फ एवी चंद्रभान बोकडे ( वय १८) हे सर्व मॉडेल मिल चौकाजवळ रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास भाजीपाला गोळा करीत होते. अचानक आरोपी सारंग उघडे, संकेत नाईक आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत अंकित बोकडेवर कोयता, चाकू तसेच लोखंडी रॉडने हल्ला चढवला. त्याचा जीव धोक्यात आल्याचे पाहून देविका मुलाच्या बचावासाठी धावल्या. दोन्ही हाताने त्या आरोपींचे वार अडविण्याचे प्रयत्न करीत असता आरोपी सारंग उघडे याने त्यांना लाथ मारली आणि त्यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केला. त्यामुळे देविकासुद्धा जबर जखमी झाल्या. आजूबाजूची मंडळी धावली. तेव्हा आरोपी पळून गेले.

---

१५ दिवसांपूर्वीचा वाद

आरोपी सारंग उघडेचा भाऊ शैलेश याच्यासोबत आकाश आणि त्याच्या मित्रांचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावेळी आकाश आणि त्याच्या मित्रांनी शैलेशला बेदम मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी शैलेशचा भाऊ सारंगने हा हल्ला केला. दरम्यान, देविका यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांची चौकशी सुरू आहे.

----

Web Title: Assault on My-Lake