शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीला फर्लो मंजूर

By admin | Updated: March 3, 2016 03:10 IST

जन्मठेपेची शिक्षा झालेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी याला कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे ...

नागपूर : जन्मठेपेची शिक्षा झालेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गुलाब गवळी याला कुटुंबाच्या भेटीसाठी उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने बुधवारी फर्लो (संचित रजा) मंजूर केली. सुधारित नियमाप्रमाणे फर्लोची मुदत २८ दिवसपर्यंत आहे. त्यामुळे गवळीकडून २८ दिवसांचा फर्लो मागण्यात आला होता. न्यायालयाने फर्लो मंजूर केला. परंतु फर्लोच्या मुदतीचे अधिकार न्यायालयाने कारागृह प्राधिकाऱ्यांकडे सोपविले. प्राधिकाऱ्याने १४ दिवसांची मुदत मंजूर केली आहे. गवळी हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृह अधीक्षकाकडे फर्लोची मागणी केली होती. परंतु त्याची मागणी फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. यापूर्वीही त्याने मे २०१५ मध्ये मुलाच्या लग्नासाठी पॅरोल (अर्जित रजा) उच्च न्यायालयामार्फत मंजूर करवून घेतली होती. आईच्या आजाराचे कारण पुढे करून त्याने ही रजा वाढवून घेतली होती. साकी नाका भागातील भूखंड हडपण्यातून ३० लाखांची सुपारी घेऊन अरुण गवळी आणि टोळीने मार्च २००८ मध्ये घाटकोपर येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. मोक्का विशेष न्यायालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये गवळी आणि अन्य ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. प्रारंभी गवळीला नवी मुंबई तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. या ठिकाणाहून त्याचे नागपूरच्या कारागृहाकडे स्थानांतरण करण्यात आले होते. उच्च न्यायालयात अरुण गवळीच्या वतीने अ‍ॅड. अनिल मार्डीकर, अ‍ॅड. मीर नगमान अली, अ‍ॅड. एम. एच. सिरिया, अ‍ॅड. मीर रिजवान अली, अ‍ॅड. रोहन मालवीय यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)