शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये आणखी शुक्रवारपर्यंत वाढ

By admin | Updated: May 27, 2015 03:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याच्या पॅरोलमध्ये शुक्रवारपर्यंत वाढ केली आहे. आपल्या ८६ वर्षीय वृद्ध आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आपली पॅरोल ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज गवळीने नागपूर विभागीय आयुक्तांकडे केला होता. आयुक्तांनी अर्जावर तातडीने निर्णय न घेतल्याने त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस जारी करून गवळीच्या पॅरोलमध्ये २६ मेपर्यंत तात्पुरती वाढ केली होती. आज मंगळवारी पुन्हा हे प्रकरण सुनावणीस आले. दरम्यान राज्य सरकारचे उत्तरही दाखल झाले. गवळीने अद्यापही आपल्या आईच्या आजाराबाबतचे वैद्यकीय दस्तऐवज न्यायालयात दाखल केलेले नाहीत. तसेच हा आजार गंभीर आजाराच्या यादीत मोडत नाही. त्यामुळे त्याला ३० दिवसांचा पॅरोल वाढवून देण्यात येऊ नये, याचिका फेटाळली जावी, असे उत्तरात नमूद करण्यात आलेले आहे. न्यायालयाने गवळीच्या पॅरोलची तात्पुरती मुदत शुक्रवारपर्यंत वाढवून दिली. शुक्रवारीच त्याच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे. गवळीचा मुलगा महेशचे ९ मे रोजी मुंबईत लग्न होते. त्यासाठी न्यायालयाने ३० एप्रिल रोजी गवळीला १५ दिवसांची सशर्त पॅरोल रजा मंजूर केली होती. त्याची ही रजा २१ मे रोजी संपली. तत्पूर्वी त्याने १३ मे रोजी नागपूर विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर करून आईच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी पॅरोलची मुदत आणखी ३० दिवसपर्यंत वाढविण्याची विनंती केली होती. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील शिशीर उके यांनी तर गवळीच्या वतीने वरिष्ठ वकील अ‍ॅड. अनिल मार्डीकर आणि अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)