शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कलाविष्कारांचा ‘नवरंग’

By admin | Updated: October 6, 2014 00:53 IST

तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे

लोकनृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : तरु णांच्या मनातील तारुण्यसुलभ भाव प्रकट करणारे गुजरातचे लोकप्रिय गरबा नृत्य, महाराष्ट्राच्या भूमितील गोंधळ नृत्य, पंजाबचे भांगडा नृत्य, वरु णराजाला प्रसन्न करण्यासाठी सादर करण्यात येणारे कर्मानृत्य, शेतकरी नृत्य, मुंबईतील कोळी बांधवांचे पालखी नृत्य आदी पारंपरिक आणि लोकसंगीताचा बाज असणाऱ्या नृत्यांनी बुधवारी नवरंगात रंग भरले. निमित्त होते लोकमत युवा नेक्स्ट व सोमलवार निकालस महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचे. ‘नटरंग’ या शिर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटनप्रसंगी डॉ. डी. आर. पांडे, सतीश मानकर, राजेंद्र आष्टनकर, प्राचार्य डॉ. नंदिनी जठार, डॉ. सीमा सोमलवार उपस्थित होते.‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या नृत्याने स्पर्धेला सुरुवात झाली. हे नृत्य सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सादर केले. ‘रंगीलो मेरे ढोलना’ या गाण्यावर डी.बी. नॅशनल नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी येताच एकच माहोल झाला. या नृत्यावर उपस्थितांनीही ठेका घेतला. सोमलवार निकाल महिला महाविद्यलयाने सादर केलेल्या ‘भांगडा’ नृत्याला रसिकांची चांगलीच दाद मिळली. संताजी महाविद्यालयाचा ‘गरबा’ नृत्य, ग्रीन हॅव्हन डीएड. कॉलेजचा ‘गोंधळ’ तर युथ कला निकेतन महाविद्यालयाच्या ‘आदिवासी’ नृत्याने स्पर्धेत चुरस आणली. सकाळपासूनच महाविद्यालयाच्या सभागृहातील वातावरण लोकसंगीताने भारून गेले होते. ढोलकी, हार्मोनियम, झांज, टाळ, डफ, टिमकी, बासरी आदी वाद्यांच्या सुरावटीने विद्यार्थ्यांची पावले मुख्य सभागृहाच्या दिशेने वळत होती. एकाहून एक सरस नृत्यांमुळे बेभान झालेल्या विद्यार्थी आणि खुद्द प्राध्यापकांनाही नाचण्याचा मोह आवरत नव्हता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजेश समर्थ आणि सविता मिश्रा यांनी काम पाहिले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन वैशाली लोंढे तर आभार प्राची लाखे यांनी मानले. या स्पर्धेचे प्रायोजक बॉयझन, हार्मोनी इव्हेन्ट्स व सोमलवार निकालस महिला महाविद्यालय होते. कार्यक्रमाला अ‍ॅड. एम. एल. सोमलवार, डॉ. महेश सोमलवार, सोमलवार अकॅडमी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य रोहित सोमलवार आणि सुप्रिया कोलवाडकर, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. (प्रतिनिधी)युथ कला निकेतन महाविद्यालयाने मारली बाजीप्रथम पुरस्कार (तीन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) युथ कला निकेतन महाविद्यालयाने पटकाविले. द्वितीय पुरस्कार (दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) सोमलवार निकालस महिला महाविद्यालयाने तर तृतीय पुरस्कार (एक हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह) संताजी महाविद्यालयाने मिळविला. उत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार ग्रीन हेवन बीएड कॉलेजला मिळाला.