शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कलावंताने स्वत:ची ताकद ओळखावी

By admin | Updated: February 21, 2016 03:03 IST

आपल्याकडे ६४ कला आहेत. परंतु ललित कलेमध्ये केवळ पाचच कलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

विनोद इंदूरकर : ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनाला सुरुवातनागपूर : आपल्याकडे ६४ कला आहेत. परंतु ललित कलेमध्ये केवळ पाचच कलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. कारण सूक्ष्मदर्शनाचे जिथे दर्शन घडते ते ललित आहे. या कलेच्या प्रत्येक कलावंताची स्वत:ची एक ताकद असते. ती ओळखणे महत्त्वाचे असते. जेव्हा याची ओळख होते तेव्हा त्या कलावंताला कुणीच थांबवू शकत नाही, असे मत, टॅगोर फाईन आर्टचे प्राध्यापक डॉ. विनोद इंदूरकर यांनी येथे व्यक्त केले. लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत आयोजित ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर ललित कला विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मुक्तादेवी मोहिते, प्रसिद्ध चित्रकार विजय बिसवाल, प्रज्ञा भिसीकर उपस्थित होते. प्रा. इंदूरकर म्हणाले, प्रत्येक चित्रातून काहीतरी अर्थ निघतो. रसिकांनी कुठलीही कला पाहताना सहृदय असले पाहिजे. तेव्हाच त्या कलेचा आनंद घेता येतो. ते म्हणाले, अनुभव म्हणजे कला नाही. परंतु एकाद्या वस्तूला स्वत:च्या ताकतीने आकार दिला जातो त्याला कला म्हणतात. कलावंतांच्या मनात संकोच नसावा. तो जर असेल तर आतील कला बाहेर येणार नाही. स्वत:हून शिका आणि त्याचा पाठपुरावा करा, हा मंत्रही त्यांनी यावेळी दिला. कलावंत हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. समाजाला संदेश देण्याचे काम करते, असे मत मुक्ता मोहिते यांनी व्यक्त केले. विजय बिसवाल यांनी सर्व चित्रकारांना शुभेच्छा देत जिद्द व आशा कायम ठेवण्याचे आवाहन केले. संचालन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक अमित गोनाडे यांनी केले. पेंटिंग, कोलाज, ग्राफिक, स्कल्पचर, डिजिटल आर्ट व फोटोग्राफी असे वैविध्यपूर्ण कलाविष्कार उलगडण्याचा प्रयत्न ‘दे नोवो समूह’ चित्र प्रदर्शनातून झाला आहे. या प्रदर्शनात अमित कुमार, अरविंद शर्मा, बिकाश स्नेहपती, दलबर सिंग, कुलदीप ग्रोव्हर, कुणाल सोनी, नरेश केओडक, राजू कुमार, राजू बैद, रामील रेधु, रणदीप सिंग, रुपेश भाटिया, समीर पॉल, संदीप कुमार, सशी कुमार, श्रीकांत, सुदीप वर्मा व विजेंद्र कुमार या १८ कलावंतांसह तीन आमंत्रित कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कला आणि समाज यांचा संबंध जोडण्यासाठी हा समूह कार्य करीत आहे. हे प्रदर्शन २३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.(प्रतिनिधी)