शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

एका व्हेंटिलेटरमधून आठ रुग्णांना कृत्रिम श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 8:54 PM

अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे.

ठळक मुद्देआनंद संचेती यांनी तयार केले ‘व्हेंटिलेटर स्प्लीटर : कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढल्यास या उपकरणाची होऊ शकते मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसांना सर्वाधिक बाधा पोहचवितोे. यामुळे रुग्ण गंभीर झाल्यास रुग्णाला श्वास घेणे अडचणीचे जाते. अशावेळी फु फ्फुसात ऑक्सिजन पोहचवण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु नागपुरात सुमारे ३५०वर व्हेंटिलेटर नाहीत. अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशासह राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे यात गंभीर रुग्णांची संख्या फार कमी आहे. परंतु खबरदारी म्हणून शासन मोठ्या संख्येत ‘क्रिटिकल केअर’ खाटांची सोय करीत आहे. यात महत्त्वाचे ठरते ते व्हेंटिलेटर. शंभर खाटांच्या तुलनेत ६० टक्के व्हेंटिलेटरची गरज पडते. परंतु सध्या ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेली विमान व रेल्वे वाहतूक, एवढ्या मोठ्या संख्येत व्हेंटिलेटरची खरेदी करणे किंवा ते विदेशातून मागविणे अडचणीचे ठरू शकते. यावर उपाय म्हणून न्यू ईरा हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरची मदत एकापेक्षा जास्त रुग्णांना होऊ शकते का, यावर विचार करणे सुरू केले. त्यांनी संगणकाच्या मदतीने थ्रीडी उपकरण तयार केले. यासाठी अमेरिकेच्या थ्रीडी डिझाईनरची मदत घेतली. नागपुरातील समीर भुसारी यांनी त्या डिझाईननुसार उपकरण तयार करून दिले. सोमवारी त्यांनी या उपकरणाच्या मदतीने आठ रुग्णांना व्हेंटिलेटरमधून ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. या उपकरणाला त्यांनी ‘व्हेंटिलेटर स्प्लीटर’ हे नाव दिले आहे. विशेष म्हणजे, एका रुग्णाचे इन्फेक्शन दुसऱ्या रुग्णाला होऊ नये म्हणून युनिर्व्हसल फिल्टर लावता येते. या कार्याचे वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे शासनस्तरावरही कौतुक होत आहे.फुफ्फुस जेव्हा कमी वेगाने काम करते तेव्हा व्हेंटिलेटरची गरज पडतेलोकमत’शी बोलताना डॉ. संचेती म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णाच्या पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटरची गरज पडत नाही. फुफ्फुस जेव्हा अतिशय कमी वेगाने काम करते तेव्हांच व्हेंटिलेटरची गरज पडते. म्हणून याला ‘लाईफ सेव्हिंग मशीन’देखील म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोनाबाधित सहा रुग्णांपैकी एक रुग्ण अतिशय गंभीर होऊन त्याला श्वास घेण्यास अडचणीचे जाऊ शकते.यांना गरज पडते व्हेंटिलेटरचीडॉ. संचेती म्हणाले, ‘कोविड-१९’ हा कोरोना विषाणू नाकातून किंवा तोंडाकडून श्वासनलिकेकडे जातो आणि नंतर फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. फुफ्फुसात लहान लहान ‘एअरसॅक’ बनवतो. कोरोनाने तयार केलेल्या छोट्या छोट्या ‘एअरसॅक’मध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात होते. रुग्ण दीर्घ व आरामात श्वास घेऊ शकत नाही. यामुळे उपचारासाठी व्हेंटिलेटर फार महत्त्वाचे ठरते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर