तरुणीचा विनयभंग, आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST2021-02-17T04:12:24+5:302021-02-17T04:12:24+5:30

सावनेर : आराेपीने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला, शिवाय तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा ...

Arrest of a young woman, rape | तरुणीचा विनयभंग, आराेपीस अटक

तरुणीचा विनयभंग, आराेपीस अटक

सावनेर : आराेपीने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला, शिवाय तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. १४) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

अतुल गुणवंत भाेयर (२८, रा. इटनगाेटी, हल्ली मु. पाटणसावंगी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपीने पीडित तरुणीला अश्लील शेरेबाजी करीत तिच्या मनास लज्जा निर्माण हाेईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. शिवाय आराेपीने पीडितेला ‘मी तुझा व तुझ्या मामाचा मर्डर करणार’ अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ३५४, ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत.

Web Title: Arrest of a young woman, rape