शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांना चाप

By admin | Updated: November 23, 2014 00:33 IST

पोलिसांनी आज पहाटे लाखोंची रेती तस्करी करणारे १४ ट्रक पकडले. दरम्यान, पहिल्या तीन-चार ट्रकचालकांची चौकशी सुरू करताच इतर ट्रकचालकांनी वाहने सोडून पळ काढला. हे रेती भरलेले ट्रक

परिमंडळ-१ ची कारवाई : १४ ट्रक पकडले नागपूर : पोलिसांनी आज पहाटे लाखोंची रेती तस्करी करणारे १४ ट्रक पकडले. दरम्यान, पहिल्या तीन-चार ट्रकचालकांची चौकशी सुरू करताच इतर ट्रकचालकांनी वाहने सोडून पळ काढला. हे रेती भरलेले ट्रक परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाने नंतर कळमना पोलिसांच्या हवाली केले. दुसऱ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कळमन्यात येऊन ही कारवाई केल्यामुळे कळमना पोलिसांची रेतीमाफियांशी असलेली मैत्री उघड झाली आहे. पोलिसांना तगडा हप्ता देऊन वाळू माफिया रोज लाखोंच्या रेतीची तस्करी करतात. कळमन्यातून रात्रभर शंभरावर ट्रक रेतीची वाहतूक होते. पोलिसांना त्यांचा हिस्सा रोजचा रोज (ज्या दिवशीचा त्याच दिवशी) मिळत असल्यामुळे, या रेती तस्करीकडे कळमन्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्याची माहिती कळाल्यामुळे परिमंडळ - १ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी रात्रपाळीतील अंबाझरीचे पोलीस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार राजू बावणे, सुरेश तालेवार तसेच एमआयडीसी ठाण्यातील सुनील मस्के, श्याम कडू, विनायक पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपरोक्त पोलिसांची दोन पथके पारडी नाक्यावर गेली. पहाटे ४.३० वाजता त्यांनी रेती भरून दिसलेले दोन टिप्पर आणि १२ ट्रक अशा १४ वाहनांची तपासणी सुरू केली. पोलीस कारवाईची कल्पना येताच १४ पैकी अनेक वाहनचालक आपापली वाहने सोडून पळून गेले. पोलिसांनी ट्रक आणि रेती असा सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल कळमना पोलिसांच्या हवाली केला. (प्रतिनिधी)कळमना पोलसांची संशयास्पद टाळाटाळ दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करूनही कळमना पोलिसांनी आज सकाळपासून गुन्हे दाखल करण्यासाठी संशयास्पद टाळाटाळ केली. वाळू माफियांचे ‘सेटिंगबाज‘ कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घुटमळत होते. त्यामुळे एकच गुन्हा दाखल करण्याचे ठरले होते. मात्र, १४ पैकी १२ वाहनचालकांकडे रेतीच्या वाहतुकीबाबत कसलीही कागदपत्रे न आढळल्यामुळे या १२ जणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी कळमना पोलिसांना दिले.