भूगर्भशास्त्र विभागप्रमुखाची नियुक्ती रद्द

By Admin | Updated: April 21, 2016 03:18 IST2016-04-21T03:18:32+5:302016-04-21T03:18:32+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी डॉ. दीपक मलपे यांची भूगर्भशास्त्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती..

Appointment of the head of the Department of Geology | भूगर्भशास्त्र विभागप्रमुखाची नियुक्ती रद्द

भूगर्भशास्त्र विभागप्रमुखाची नियुक्ती रद्द

हायकोर्टाचा दणका : विद्यापीठाचा निर्णय ठरवला अवैध
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी डॉ. दीपक मलपे यांची भूगर्भशास्त्र विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय अवैध ठरवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला. तसेच, या पदावर कायद्यानुसार नियुक्ती करण्याचे निर्देश दिलेत.
या नियुक्तीविरुद्ध डॉ. अनिल पोफरे यांनी रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांनी ही याचिका मंजूर करून वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. याचिकेतील माहितीनुसार, डॉ. मलपे हे डॉ. पोफरे यांच्यापेक्षा सेवेत १६ दिवसांनी कनिष्ठ आहेत. वरिष्ठता यादीनुसार पोफरे विभाग प्रमुखपदाचे दावेदार आहेत. असे असताना विद्यापीठाने २५ मे २०१५ रोजी मलपे यांची विभाग प्रमुखपदी नियुक्ती केली.
ही नियुक्ती अवैध असल्याचा दावा करून पोफरे यांनी २५ मे रोजी विद्यापीठाचे कुलगुरूंकडे तक्रार सादर केली होती. तसेच, ६ जुलै रोजी कुलपतींना निवेदन सादर केले होते. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही.
परिणामी पोफरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Appointment of the head of the Department of Geology