शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तापक्ष नेत्याशिवाय आज महापौरांचे पदग्रहण

By admin | Updated: September 8, 2014 02:18 IST

महापालिकेचे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार उद्या, सोमवारी महापालिकेत आयोजित एका सोहळ्यात पदग्रहण करतील. 1

नागपूर : महापालिकेचे नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार उद्या, सोमवारी महापालिकेत आयोजित एका सोहळ्यात पदग्रहण करतील. मात्र, या पदग्रहणाला सत्तापक्ष नेत्याची खुर्ची रिकामी असणार आहे. दटके महापौर झाल्यानंतर त्यांच्या जागी सत्तापक्ष नेते म्हणून अद्याप कुणाचीही नियुक्ती भाजपने केलेली नाही. या पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असून या मुद्यावर महापालिकेतील भाजप दोन गटात विभागल्या गेली आहे.महापौर निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. तीत सत्तापक्ष नेते पदावर चर्चा झाली पण निर्णय गडकरी- फडणवीस घेतील, असे ठरले होते. महापौर निवडीसाठी बोलाविलेल्या सभेतच सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी या पदासाठी कुठाही वाद नसून लवकरच नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आता तीन दिवस उलटूनही निवड झाली नसल्याने पक्षात या मुद्यावर घमासान सुरू असल्याचे स्पष्ट होते. महापालिकेत विकास ठाकरे यांच्यासारखा आक्रमक विरोधी पक्षनेता आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल गुडधे यांच्यासारखा अभ्यासु व खिंडीत पकडणारा नगरसेवक आहे. या दोन्ही नेत्यांना युक्तिवाद करून थोपविण्याचे काम सत्तापक्ष नेता म्हणून प्रवीण दटके यांनी कुशलतेने पार पाडले. त्यामुळे दटके यांच्या जागी सत्तापक्ष नेता म्हणून विरोधी पक्षाचे आव्हान पेलणारा आक्रमक नेता असणे गरजेचे आहे. ही बाब भाजपचे बहुतांश नरसेवक खासगीत मान्यही करीत आहेत. मात्र उघडपणे बोलायला कुणी तयार नाही. (प्रतिनिधी)