शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रमध्ये आणखी एक नगररचना संचालक कशासाठी?

By admin | Updated: May 28, 2015 02:28 IST

नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आणखी एका नगररचना संचालकपदाची निर्मिती केली जाणार आहे.

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये आणखी एका नगररचना संचालकपदाची निर्मिती केली जाणार आहे. या संबंधीचा विषय आज, गुरुवारी नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र, विश्वस्तांच्या या प्रस्तावाला विरोध आहे. शहरातील जवळपास सर्वच ले-आऊट महापालिकेकडे हस्तांतरित झाले असताना आणखी एक नगररचना संचालक कशासाठी, असा सवाल विश्वस्तांनी उपस्थित केला आहे. या मुद्यावर बैठकीत विश्वस्त विरुद्ध प्रशासन असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले बहुतांश ले-आऊट महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. शहरातील काही अनधिकृत वस्त्यांचे नियमितीकरण सोडल्यास सर्वच कामे संपली आहेत. ब्रिटिश काळात टाऊन प्लॅनिंगसाठी सुधार प्रन्यासची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी शहरातील ५२ योजना प्रन्यासकडे होत्या. तेव्हापासून एकच नगररचना उपसंचालकाचे पद आहे. यापैकी ४५ योजना प्रन्यासने पूर्ण केल्या आहेत. आता फक्त सात स्ट्रीट स्कीम एवढ्याच योजना प्रन्यासकडे आहेत. याशिवाय आता नासुप्रवर आता मेट्रो रिजनचा विकास व नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही सर्व कामे प्रन्यासतर्फे खासगी कन्सल्टंट यांच्या माध्यमातून केली जात आहेत. विशेष म्हणजे याकरिता नगररचना उपसंचालकपद आधीच मंजूर आहे. सुजाता कडू सध्या या पदावर कार्यरत आहेत. नुकतेच राज्य सरकारने महापालिकेलाही नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. शहरातील योजनांचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असताना आता नासुप्रमध्ये नगररचना संचालकाचे आणखी एक पद निर्माण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नासुप्रच्या अभियंत्यांनीही हा विषय आपल्या समजण्यापलिकडील असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)