शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांचे मॅरेथॉन बौद्धिक

By admin | Updated: March 8, 2015 02:26 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अवघे काही दिवस उरले असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला अवघे काही दिवस उरले असताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ऐन धुळवडीच्या दिवशी संघ मुख्यालयाला भेट दिली. दिवसभरात शहा यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासमवेत संघाच्या वरिष्ठ पदाधिकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. सुमारे नऊ तास शहा संघ मुख्यालयात होते. यावेळी संघ आणि भाजपातील संघटनात्मक बदलांवर सखोल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहा यांनी दुसऱ्यांंदा संघस्थानाला भेट दिली. शहा यांचे सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर सकाळी १० वाजता ते महाल परिसरातील संघ मुख्यालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल हेदेखील होते. सकाळच्या सुमारासच बैठकांचे सत्र सुरू झाले. १३ मार्चपासून नागपुरात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू होणार असल्याने संघाचे वरिष्ठ पदाधिकारी मुख्यालयातच आहेत. सुरुवातीला सरसंघचालक, सरकार्यवाह व सहसरकार्यवाह दत्ताजी होसबळे यांनी शहा यांच्याकडून पक्षातील विविध मुद्यांसंदर्भात सखोल चर्चा केली. याप्रसंगी संघ व भाजपामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडणारे सहसरकार्यवाह कृष्णगोपालदेखील उपस्थित होते. यात सर्वात जास्त भर होता तो जम्मू व काश्मीरमधील स्थितीवर. सत्तास्थापनेनंतर ३७० कलम रद्द करण्याच्या भूमिकेसंदर्भात पक्षाचे धोरण काय असायला हवे, यावर संघ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाने आपली भूमिका सोडता कामा नये. जर पक्ष भूमिकेपासून दूर झाला तर जनतेत चुकीची प्रतिमा निर्माण होईल व पुढील निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो हा स्पष्ट संदेश यावेळी शहा यांना देण्यात आला. सोबतच भूसंपादन विधेयकावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात सरसंघचालकांनी संघाच्या अपेक्षा व्यक्त केल्या. संघ परिवारातील अनेक संघटना या विधेयकातील तरतुदींच्या विरोधात आहेत. (प्रतिनिधी)