बलात्कार प्रकरणात आंबेकर पोहोचला कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:06 AM2019-11-14T00:06:35+5:302019-11-14T00:07:27+5:30

गँगस्टर संतोष आंबेकरला मुलाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी कारागृहात रवानगी केली. गुरुवारी सोनेगाव पोलीस खंडणी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात आंबेकरला अटक करणार आहे.

Ambekar reaches jail in rape case | बलात्कार प्रकरणात आंबेकर पोहोचला कारागृहात

बलात्कार प्रकरणात आंबेकर पोहोचला कारागृहात

Next
ठळक मुद्देमुंबई-बेंगळुरू पोलीस पोहोचले : आता सोनेगाव प्रकरणात होणार अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गँगस्टर संतोष आंबेकरला मुलाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी कारागृहात रवानगी केली. गुरुवारी सोनेगाव पोलीस खंडणी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात आंबेकरला अटक करणार आहे. आंबेकरला पोलीस कोठडी आणि कारागृहात बुधवारी एक महिना पूर्ण झाला आहे.
पीडित युवती मुलाची मैत्रीण असल्यामुळे आंबेकरची तिच्यावर नजर होती. पीडिता अल्पवयीन असतानाच आंबेकर तिचा त्रास देत होता. फोन करून आपत्तीजनक गोष्टी आणि हातवारे करायचा. या अल्पवयीनला एकदा तो हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करू लागला. तो तिला मुंबई आणि बेंगळुरू येथे घेऊन गेला. तेथील हॉटेलमध्ये त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आंबेकरची दहशत असल्यामुळे पीडिताने तक्रार करण्याची हिंमत दाखविली नाही. या कारणामुळे आंबेकर आपल्याच घरी तिचे लैंगिक शोषण करू लागला.
१२ आॅक्टोबरला खंडणी आणि फसवणुकीच्या प्रकरणात आंबेकरला अटक केल्यानंतर पीडित युवती हिंमत दाखवून तक्रार करण्यासाठी पुढे आली. या प्रकरणात ६ नोव्हेंबरला त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आंबेकरचे अनेक सोबती आणि भागीदार आताही शहरात सक्रिय आहेत. एक महिन्यानंतरही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. हे लोक त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने आंबेकरला मदत करण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे पीडित युवती चिंतेत आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांना या प्रकरणांच्या तपासणीसाठी मुंबई आणि बेंगळुरूला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासणीत आंबेकर अय्याश असल्याचे पुढे आले आहे. त्याचे मकोकामध्ये आरोपी विवाहितासोबतही संबंध होते. त्याने विवाहितेला मुंबईत फ्लॅट घेऊन दिला आहे. त्याची प्रारंभी विवाहितेच्या पतीसोबत मित्रता होती. पत्नीवर नजर जाताच त्याने तिच्याशी संबंध जोडले. त्याचा विरोध केल्यानंतर ती पतीला आंबेकरच्या मदतीने माराहाण करीत होती.
बदनामीच्या भीतीने आंबेकरची तक्रार करण्यास अनेक पीडित अजूनही समोर आलेले नाहीत. बलात्कार प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर चौकशी अधिकारी एपीआय अनुपमा जगताप यांनी न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडी वाढविण्याची विनंती केली. न्यायालयाने नकार देताना न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठविले. गुरुवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एक कोटीची खंडणी आणि फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयातून प्रॉडक्शन वारंट घेऊन संतोष आंबेकर आणि अरविंद पटेलला अटक करण्यात येणार आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आंबेकरचा भाचा सन्नी वर्माला पूर्वीच अटक केली आहे, तर राम पाटील नामक साथीदार फरार आहे. आंबेकरने गुजरात, वापी येथील व्यापारी हेमंत पटेलची फसवणूक केली आहे. हेमंतची राम पाटील याच्यासोबत ओळख होती. पाटीलने हेमंतची आंबेकरसोबत भेट घडवून आणली होती. आंबेकरने हेमंतला सांगितले की, नेत्यांना नेहमीच दोन हजारांच्या नोटांची गरज असते. मी नेत्यांसाठी काम करतो. त्याने दोन हजाराच्या नोटा घेऊन पाचशेच्या नोटा परत केल्या. त्याने एक कोटीच्या बदल्यात एक लाख रुपये कमिशन देण्याची बतावणी केली. त्यानंतर हेमंतची फसवणूक करण्यात आली.
अरविंद पटेल हवाला व्यावसायिक आहे. हेमंतने त्याच्या बालाजी फर्ममध्ये रुपये जमा केले होते. पोलिसांनी अरविंदविरुद्ध मकोकाची कारवाई केली आहे. सोनेगांव प्रकरणी चौकशी अधिकारी अनिल ताकसांडे गुरुवारी न्यायालयातून प्रॉडक्सन वारंट घेऊन आंबेकर आणि अरविंद पटेलला अटक करणार आहे.

आताही सक्रिय आहेत भागीदार
गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आंबेकरचे अनेक साथीदार आणि भागीदार आताही शहरात सक्रिय आहेत. एक महिन्यानंतरही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केलेली नाही.

Web Title: Ambekar reaches jail in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.