शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रामझुल्याची प्रतीक्षा कायमच

By admin | Updated: November 26, 2014 01:10 IST

रामझुला प्रकल्प किती दिवसांत बांधून पूर्ण होईल यासंदर्भात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंत्राटदार कंपनी स्वत:च ठाम नाही. कंपनी संधी मिळेल तेव्हा बांधकामाची मुदत वाढवून मागत आहे.

पुन्हा वाढवून मागितला बांधण्याचा कालावधी : हायकोर्टात २ डिसेंबरला सुनावणी
नागपूर : रामझुला प्रकल्प किती दिवसांत बांधून पूर्ण होईल यासंदर्भात अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंत्राटदार कंपनी स्वत:च ठाम नाही. कंपनी संधी मिळेल तेव्हा बांधकामाची मुदत वाढवून मागत आहे. रामझुल्याच्या द्वितीय टप्प्याच्या बांधकामासाठी कंपनीने आधी २१ एप्रिल २०१६ पर्यंत मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. मंगळवारी कंपनीने यात आणखी २ महिने वाढवून देण्यासाठी दुरुस्ती अर्ज केला. हायकोर्टाने यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून प्रकरणावरील पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी निश्चित केली.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रामझुल्याच्या बांधकामाला आणखी मुदतवाढ देण्यास प्रकरणातील मध्यस्थ विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी विरोध केला आहे. कंपनीने १३ आॅक्टोबर रोजी अर्ज सादर करून संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २१ एप्रिल २०१६ पर्यंत, तर प्रथम टप्प्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. यानंतर २८ आॅक्टोबर रोजी दुसरा अर्ज सादर करून पहिल्या टप्प्यासाठी आणखी २ महिने मुदत वाढवून मागितली, तर आज दुसऱ्या टप्प्याच्या मुदवाढीसाठी दुरुस्ती अर्ज केला.
शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १७ जानेवारी २००६ रोजी रामझुला बांधकामाचा करार झाला आहे. करारानुसार संपूर्ण प्रकल्प ४२ महिन्यांत म्हणजे आॅगस्ट-२००९ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, १०० वर महिने लोटल्यानंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च ४६ कोटी रुपये होता. हा खर्च आता १०० कोटींवर गेला आहे. मध्यस्थातर्फे अ‍ॅड. हरनीश गढिया, तर अ‍ॅफकॉन्सतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)
असे आहे प्रकरण
रामझुल्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित कालावधी ठरवून देण्याकरिता नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सने जनहित याचिका दाखल केली होती. शासन व अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने प्रतिज्ञापत्र दाखल करून संपूर्ण प्रकल्प ३० आॅक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. तत्कालीन न्यायमूर्तीद्वय पी. व्ही. हरदास व एम. एल. तहलियानी यांनी त्यांचे म्हणणे स्वीकारून ६ जुलै २०१२ रोजी जनहित याचिका निकाली काढली होती. रेणू यांचा मध्यस्थी अर्जही न्यायालयाने मंजूर केला होता. आश्वासन पाळण्यात अपयश आल्यामुळे कंपनीने आता मुदतवाढीसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.