शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

याहीवेळी ‘फिल गुड’

By admin | Updated: June 14, 2014 03:02 IST

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात यावेळी ‘फिल गुड’ अशी स्थिती आहे.

जितेंद्र ढवळे नागपूर
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात यावेळी ‘फिल गुड’ अशी स्थिती आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस येथे मैदानात उतरतील. राज्यात प्रचाराची धुरा असतानाही दक्षिण-पश्चिमध्ये फडणवीस यांनी लोकसभेत नितीन गडकरी यांना ६२

हजार ७२३ मतांची लीड दिली.
गडकरी यांना १ लाख ६७२५ मते मिळाली तर काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना केवळ ४४ हजार मतांवर थांबावे लागले. काँग्रसचे येथे पानिपत झाले. फडणवीस यांचा दावा

असल्याने येथे भाजपमध्ये कोणाचाही दावा असणार नाही. तशी शिस्त या मतदार संघातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात आहे.
काँग्रेसमध्ये यावेळी दक्षिण- पश्चिममध्ये कोण लढणार, हे अद्याप स्पष्ट नाही. गेल्यावेळी दक्षिण-पश्चिममध्ये नशीब अजमाविणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी

यावेळी पश्चिममध्ये मोर्चा वळविला आहे. गेल्यावेळी ठाकरे यांना येथे ६१, ४८३ मते मिळाली होती.
लोकसभा प्रचारात ठाकरे यांनी या मतदार संघात काँग्रेसच्या वतीने लीड घेतला होता. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी येथे काँग्रेसच्या वतीने दावा केला आहे. तशी इच्छाही

त्यांनी शहर आणि प्रदेश काँग्रेसकडे व्यक्त केली आहे. गुडधे यांचे दक्षिण-पश्चिमशी कौटुंबिक नाते आहे ! इकडे नगरसेविका अ‍ॅड.रेखा बारहाते यांचाही काँग्रेसच्या वतीने

येथे दावा राहील.
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दलिस्त वस्त्यांचा समावेश आहे. गेल्यावेळी रिडालोसच्या वतीने जयदीप कवाडे यांनी येथे निवडणूक लढविली होती. त्यांना १ हजार ४३८

मते मिळाली होती. भाजपने मात्र येथे लोकसभेत महायुतीतील घटक पक्ष रिपाइं (आठवले) ची मदत कॅश केली. गतवेळी भारिपचे राजू लोखंडे यांनी १० हजार ५३३ मते

मिळवीत तिसरा क्रमांक गाठला होता.
आम आदमी पार्टीने अनपेक्षितपणे या मतदारसंघात मुसंडी मारली. आम आदमी भाजपची मते घेणार असा अंदाज होता. त्यामुळे या पक्षाला काँग्रेसनेही गांभीर्याने घेतले नाही.

मात्र प्रत्यक्षात काँग्रेसलाच त्याचा फटका बसला. या मतदार संघात मनसेने तगडा उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे. यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांचा

दावा आहे. श्रेष्ठींच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा आहे. मतदार संघातील स्थानिक प्रश्न, समस्या याकडे मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेची यंत्रणा प्रयत्नशील आहे.