शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:54 IST

मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

ठळक मुद्देवनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली गावकऱ्यांसोबत बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन अधिकारी व कर्मचारी गावात पोहचले. त्यांनाही वाघाचे पगमार्क दिसले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाची हालचाल लक्षात घेतली. त्यांंनी वाघ बुटीबोरी होत बोर अभयारण्याकडे जात असल्याची संभावना व्यक्त केली.परंतु बुटीबोरी जंगलाकडे जाणाऱ्या मार्गावर गाव असल्याने वन अधिकाऱ्यांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून बुधवारी रात्री गावकऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, वन्यजीव अध्ययनकर्ता विनीत अरोरा, आरएफओ विजय गंगावने उपस्थित होते. शनिवारी मिहान परिसरात इन्फोसिस कंपनीच्या मागे एका कर्मचाऱ्याला वाघ दिसला होता. यानंतर वनविभागाने परिसरात तात्काळ कॅमेरा ट्रॅप लावले. रविवारी रात्री १०.३० वाजता एका कॅमेऱ्यात वाघ कैदही झाला. त्यानंतर वन विभागाने मिहान परिसरात ३० कॅमेरा ट्रॅप लावले. दिवसरात्र परिसरात गस्त दिली. सोमवार व मंगळवार वाघ काही दिसला नाही. परंतु बुधवारी दोन लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जात असल्याचे दिसले. बुधवारी गावकऱ्यांना वाघ दिसल्यावर काय सावधगिरी बाळगली पाहिजे, यासंदर्भात सूचना केल्या. यापूर्वी फेटरीतही दिसला होता वाघकाटोल रोडवरील फेटरी येथे काही दिवसांपूर्वी वाघ दिसला होता, तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वनविभागाने फेटरी व आसपासच्या गावातील प्रमुख व्यक्तींसोबत सरपंच यांची बैठक घेतली होती. त्यांना नागपुरात बोलावून लाईव्ह प्रशिक्षण दिले होते. वाघ दिसल्यास कुठली सावधगिरी बाळगावी, हे समजून घेत गावकऱ्यांनी वन विभागाशी समन्वय साधला होता. त्यामुळे फेटरी येथे कुठलीही अनुचित घटना घडली नाही आणि वाघही आपल्या अधिवासात निघून गेला. फेटरीचाच फॉर्म्युला वनविभाग मिहान, बुटीबोरी परिसरातील गावात वापरत आहे. अफवा पसरविणाऱ्याला नोटीसमिहान परिसरात वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून अफवा पसरविली जात आहे. वाघाचे फोटो पोस्ट करून लोकांमध्ये दहशत पसरविली जात आहे. अशा लोकांवर वनविभागाची टीम नजर ठेवून आहे. काही लोकांची नावे वनविभागाला कळली आहे. त्यांना लवकरच नोटीस देऊन त्यांच्याकडून पुष्टीचे प्रमाण मागणार आहे.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर