शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळांजवळ कृषी निर्यात केंद्र हवे

By admin | Updated: November 13, 2016 02:56 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी

विजय रुपानी यांचे प्रतिपादन : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकरी कार्यशाळांचे उद्घाटननागपूर : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी विमानतळाशेजारी कृषी निर्यात केंद्र आवश्यक आहे. गुजरातमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात वाढली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी उत्पादनाचा माल शेतातच उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले. रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात आयोजित कार्यशाळांच्या उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यमउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह हे उपस्थित होते. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषक किसान सेलचे अजय वीर जाखड, सी.डी.मायी, टी.नंदकुमार, अमूलचे आर.एस.सोढी, संयोजक गिरीश गांधी,‘वेद’चे अध्यक्ष देवेन पारख, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. गुजरातमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचा विकास जास्त कसा होईल, यावर भर देण्यात येत आहे. कृषी कर्ज १८ ऐवजी केवळ १ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे १ लाख ११ हजार कोटी रुपयांनी उत्पादनात वाढ झाली आहे व कृषी विकासाचा दर १७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शेतकऱ्यांना शेतातच ‘ई-गाव’ व ‘ई-पोर्टल’च्या माध्यमातून जगातील सर्व कृषी उत्पादनाचे भाव उपलब्ध होत आहेत.शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट कसे होईल, यासाठी गुजरात सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रुपानी यांनी दिली. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. येत्या काळात ‘वेस्ट इन टू बेस्ट’ या प्रणालीवर काम करण्यात येणार आहे. गुजरातमध्येदेखील ‘बायोटेक्नॉलॉजी’ व ‘मिथेनॉल’ निर्मितीचा प्रयोग राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी गडकरी यांनी कृषीक्षेत्रातील ‘गुजरात मॉडेल’ची प्रशंसा केली. महाराष्ट्रातदेखील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इत्यादी विमानतळाजवळील ५ एकर जमिनीवर शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रकल्प सुरू झाले पाहिजे. तसेच सिंचनासाठी ४० हजार कोटींची तरतूद झाली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी कृषी कल्याणच्या ‘ऊस’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.डी.मायी यांनी केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले तर रवी बोरटकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दूध उत्पादनात वाढ हवीयावेळी नितीन गडकरी यांनी दूध उत्पादन वाढीसंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान आणि गुजरातमध्ये दूध उत्पादनाचे प्रमाण दुप्पट आहे. दूध उत्पादनात गुजरातचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ‘एनडीटीबी’ च्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दुधाचे उत्पादन वाढविण्याचे आव्हान शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. गडकरी माझे गुरू : गिरीराज सिंहयावेळी गिरीराज सिंह यांनी नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले. नितीन गडकरी हे माझे गुरूच आहेत. त्यांच्यापासून मी नेहमीच मार्गदर्शन घेतो, असे सिंह म्हणाले. देशात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक पिकांसाठी शेकडो लिटर पाणी लागते. मात्र पाण्याची कमतरता लक्षात घेता योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे मतदेखील त्यांनी व्यक्त केले.