शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गीत रचनेसाठीही आता हवा ‘सेन्सॉर बोर्ड’

By admin | Updated: January 26, 2015 01:02 IST

चित्रपट संगीताच्या नैतिक मूल्यांच्या पडझडीवर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनीदेखील टीका केली आहे. गेल्या काही काळापासून गाण्यांमध्ये अश्लील

नागपूर : चित्रपट संगीताच्या नैतिक मूल्यांच्या पडझडीवर सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर प्रख्यात गायक सुखविंदर सिंह यांनीदेखील टीका केली आहे. गेल्या काही काळापासून गाण्यांमध्ये अश्लील शब्दांचा उपयोग वाढीस लागला आहे. समाजातील घटकांवर याचा वाईट परिणाम होत असून गाण्यांसाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ असावे अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित नागपूर महोत्सवासाठी उपराजधानीत आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.चित्रपट संगीतक्षेत्रात गुलजार, जावेद अख्तर, विशाल भारद्वाज, ए.आर.रहमान यांच्यासारख्या व्यक्तींमुळे ‘क्लास’ टिकून आहे. परंतु झटपट प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही जणांकडून अश्लीलतेचा आधार घेतला जातो ही दुर्दैवी बाब आहे. मुळात स्वत:च्या कर्तृत्वातील त्रुटी लपविण्यासाठी असे प्रकार केले जातात, अशी टीका त्यांनी केली. या गाण्यांमुळे समाजावर व विशेषत: युवावर्गावर वाईट परिणाम होतो. शिवाय गाण्यांचा दर्जादेखील खालवतो. गाण्यांसाठी ‘सेन्सॉर बोर्ड’संदर्भात केंद्र शासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. जुन्या गाण्यांचे ‘रिमेक’ किंवा ‘फ्युजन’देखील करण्यात येत आहे. यातून संबंधित व्यक्तींकडे नाविन्यपूर्ण गाणी सादर करण्याची क्षमता नसल्याचे स्पष्ट होते असा टोलादेखील त्यांनी मारला. मराठी चित्रपटात गायन करायला आवडते व मराठी मला माझ्या मातृभाषेसारखीच आहे असेदेखील ते म्हणाले. ‘अवॉर्ड’पेक्षा जनतेचा ‘रिवॉर्ड’ महत्त्वाचानिरनिराळ्या चित्रपट अवॉर्डबद्दलदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. चार लोक मिळून ‘अवॉर्ड’ कोणाला जाईल ते ठरवितात. त्यामुळे मला अशा ‘अवॉर्ड’पेक्षा जनतेकडून मिळणारा प्रशंसेचा ‘रिवॉर्ड’ जास्त आवडतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘रिअ‍ॅलिटी शो’मधून संगीतक्षेत्राला चांगले कलाकार मिळू शकतात. केवळ त्यांना ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे असेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)