आरटीओचे कामकाज प्रभावित

By Admin | Updated: June 11, 2014 01:11 IST2014-06-11T01:11:01+5:302014-06-11T01:11:01+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वचे साधारण ९० टक्के कर्मचारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. यामुळे सोमवारी आरटीओचे

Affected by the work of RTO | आरटीओचे कामकाज प्रभावित

आरटीओचे कामकाज प्रभावित

९० टक्के कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणावर : अनेक विभाग बंद
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वचे साधारण ९० टक्के कर्मचारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. यामुळे सोमवारी आरटीओचे कामकाज प्रभावित झाले. परवान्यापासून ते परमीटपर्यंतचे सर्वच विभाग बंद पडले. परिणामी विविध कामांसाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आरटीओ कार्यालयात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. एका कर्मचाऱ्यावर तीन कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण आहे.
यातच २० जून रोजी होऊ घालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा भारही येथील कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आला आहे. यामुळे आज ९० टक्के कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी गेले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आरटीओमध्ये गर्दी उसळली होती. परंतु सकाळी ११ वाजूनही कामकाज सुरू न झाल्याने लोकांनी गोंधळ घातला; अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांची समजूत काढावी लागली. कार्यालयात १० टक्केच कर्मचारी, त्यातही अपंग आणि महिला असल्याने कार्यालयातील वाहन परवाना, परमीट, ट्रान्सफर व इतर विभाग बंद होते.

वाहनांचे पासिंग आणि नवीन वाहनांची नोंदणी एवढेच काम सुरू होते. अशीच स्थिती १९ व २० जून रोजी राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Affected by the work of RTO