नागपूरजवळ अदानींचा ७० हजार कोटींचा मेगाप्रकल्प; ३० हजार जणांना देणार रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:01 IST2026-02-07T16:52:11+5:302026-02-07T17:01:00+5:30
Nagpur : नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे अदानी कंपनीतर्फे एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे.

Adani's mega project of Rs 70 thousand crores near Nagpur; Will provide employment to 30 thousand people
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे अदानी कंपनीतर्फे एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. यासाठी ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल, अशी माहिती अदानी एअरपोर्ट्सचे संचालक आणि अदानी डिजिटल लॅब्सचे प्रमुख जीत अदानी यांनी येथे दिली.
हा प्रकल्प नागपूरला स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर ठळक स्थान मिळवून देईल आणि भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेला अधिक बळकटी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या वतीने आयोजित 'खासदार औद्योगिक महोत्सव-अॅडव्हांटेज विदर्भ-२०२६' मध्ये जीत अदानी यांनी सांगितले की, अदानी समूह महाराष्ट्राच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. येथे अदानी समूह तिरोडा प्रकल्पात ३,३०० मेगावॉट क्षमतेचा अत्याधुनिक सुपरक्रिटिकल वीज प्रकल्प चालवत आहे. तसेच नागपूरलगत असलेल्या बुटीबोरी येथे ६०० मेगावॉट क्षमतेचा बुटीबोरी वीउ प्रकल्प पुन्हा सुरू करून समूहान पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्य आहेत. वीजपुरवठ्याबाबत बोलायचं झाल्यास, अदानी समूह महाराष्ट्राल एकूण ६,६०० मेगावॉट वीजपुरवठा करत आहे, जी राज्यातील उद्योग आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते.
विदर्भाला भारताच्या 'लॉजिस्टिक्स गेटवे' म्हणून स्थापित करण्यासाठी अदाणी समूह अनेक आघाड्यांवर काम करत आहे. मिहान येथील एमआरओ हब हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मिहानमध्ये ३० एकरांवर उभारलेले एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल) संकुल आता आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित होत आहे. दुसऱ्या बाजूला बोरखेडी आयसीडीबाबत बोलायचे झाल्यास, ७५ एकरांवर पसरलेले हे केंद्र मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यास आणि निर्यात वाढविण्यास मदत करत आहे.
गोंडखैरी येथील समूहाच्या भूमिगत खाणीला जीत अदानी यांनी 'गोल्ड स्टॅण्डर्ड' असे संबोधले. येथे कोणतेही विस्थापन न करता आणि ब्लास्टिंगशिवार तंत्रज्ञानाधारित खाणकाम केले जात आहे. समूहाने २०३० पर्यंत १० कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यामध्ये विदर्भाची महत्त्वाची भूमिका असेल. अदानी समूह विदर्भासाठी केवळ गुंतवणूकदार नसून एक दीर्घकालीन भागीदार असल्याचेही अदानी यांनी स्पष्ट केले.