शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST

रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन बनविला आहे.

नागपूर : रेतीचे अवैध उत्खनन करून सरकारला कोट्यवधींचा फटका देणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन बनविला आहे. दुसरीकडे शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने वाळू माफियांना आज सावधानतेचा इशारा देत सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
रेतीघाट बंद असूनदेखील नागपूर शहरात रोज ३०० ते ४०० ट्रक रेती येते. वैनगंगेच्या पात्रातून ही रेती चोरून आणली जाते. सर्वाधिक रेती रोहा, बेताळा, कोतुर्णा, टाकळी, खमाटी या घाटावरून काढली जाते. यापैकी काही ठिकाणी वाळू माफियांनी चक्क मशीनच लावल्याची सूत्रांची माहिती आहे.
वाळू माफिया ट्रकचालकांना दारू पाजून प्रमाणापेक्षा जास्त (ओव्हरलोड) रेती भरून भंडारा, रामटेक, उमरेड(पवनी)मार्गे ही रेती नागपुरात आणतात. पोलीस, परिवहन विभाग (आरटीओ) आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांना त्याची माहिती असते. मात्र, यातून त्यांना त्यांचा हिस्सा रोजच हातात पडत असल्यामुळे या तस्करीकडे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
आज लोकमतने ठळकपणे रेती तस्करीचे वृत्त प्रकाशित करताच वाळू माफिया आणि भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणले. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील वाळू माफियांनी ठिय्ये रिकामे करण्यासाठी धडपड चालवली.
पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने आपल्या हस्तकामार्फत वाळू माफियांना निरोप पाठवून सतर्कतेने काम करण्याचा सल्ला दिल्याचे समजते.
दुसरीकडे वाळू माफियांच्या विरोधात आपण अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून, लवकरच त्याचे परिणाम बघायला मिळतील,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज लोकमतला दिली. कारवाईची योजना कशी असेल, हे सांगणे योग्य होणार नाही. मात्र, सांगण्यापेक्षा कृतीच करून दाखवू, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)
असोसिएशनचा आरोप
वाळू माफियांना पोलीस, आरटीओ आणि महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळेच रोज लाखोंच्या रेतीची तस्करी केली जात असल्याचा आरोप युनायटेड लोकल ट्रक असोसिएशनने केला. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच आज असोसिएशनचे अध्यक्ष शंकर गुप्ता तसेच साजीदखान समशेर खान, अतिक आलम, अशोक रामलखन पवन, प्रवीण दुल्हेवाले, भागवत मेश्राम, आसिफ खान बबलू कुरेशी यांनी एक प्रसिद्धी पत्रक दिले. पोलीस, महसूल आणि आरटीओंकडे वारंवार लेखी तक्रारी करून, पुरावे देऊनही वाळू माफियांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप उपरोक्त पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धी पत्रकातून केला.