१२ प्रतिष्ठानांवर कारवाई; ७० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:29+5:302021-03-08T04:08:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १२ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजार रुपयांचा ...

Action on 12 establishments; A fine of Rs 70,000 | १२ प्रतिष्ठानांवर कारवाई; ७० हजारांचा दंड

१२ प्रतिष्ठानांवर कारवाई; ७० हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने रविवारी १२ दुकाने, प्रतिष्ठानांवर कारवाई करून ७० हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ९२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सात मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ४० हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील सहा प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. पाच हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनअंतर्गत ८ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील १४ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली.

गांधीबाग झोन क्षेत्रातील सात प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील पाच प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. लकडगंज झोनअंतर्गत एकूण १० प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड वसूल केला. आशीनगर झोनमध्येही १२ प्रतिष्ठाने तपासली. १५ हजार रुपये दंड केला. मंगळवारी झोनमधील १८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. १० हजार दंड वसूल केला.

Web Title: Action on 12 establishments; A fine of Rs 70,000