शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गवसले नाहीत आरोपी

By admin | Updated: July 18, 2014 00:59 IST

पवनी येथे देशीकट्ट्यातून तीन गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना

पवनी येथील गोळीबारप्रकरण : पोलिसांची शोधमोहीम सुरूदेवलापार : पवनी येथे देशीकट्ट्यातून तीन गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यानंतर आरोपी घटनास्थळाहून पसार झाले असून आरोपींना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दरम्यान, या गोळीबार प्रकरणातील मृतावर आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हजारो नागरिकांच्या उपस्थितीत, पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.धनेश बंसीधर गुप्ता (२७, रा. देवलापार) असे मृताचे आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पवनी येथे मोबाईल दुकानात त्याच्या गोळीबार करून हत्या केली. तर त्याच्या मदतीसाठी धावलेला त्याचा भाऊ स्मित याला आरोपींनी मारहाण केली. याबाबत मृताचा भाऊ स्मित याने दिलेल्या तक्रारीत १५ आरोपी असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७ सहकलम ३, २५ आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीत इंदल यादव, सुनील यादव, जयसिंग यादव, प्रेमलाल यादव, मलखान तुफान यासह इतर एकूण १५ जण असल्याचे नमूद आहे. या घटनेला एक दिवस होऊनही आरोपींपैकी एकालाही पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. या घटनेतील मृत धनेश याचा मृतदेह दुपारच्या सुमारास पोलिसांच्या कडक बंदोबस्तात देवलापार येथे आणण्यात आला. ज्या वाहनातून मृतदेह आणला त्या वाहनासोबत पोलिसांची दोन वाहने, राज्य राखीव बल, दोन कमांडो पथक असा एकूण ५० ते ६० जणांचा पोलीस ताफा होता. मृताच्या घरी आधीच हजारोच्या संख्येत नागरिक होते. त्यामुळे नागरिकांच्या हालचालीवर पोलीस लक्ष ठेवून होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. देवलापार येथे पोलिसांचा ताफा तैनात असून छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)