आरोपीला सात वर्षे कारावास

By Admin | Updated: April 17, 2016 02:54 IST2016-04-17T02:54:21+5:302016-04-17T02:54:21+5:30

एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

The accused has been imprisoned for seven years | आरोपीला सात वर्षे कारावास

आरोपीला सात वर्षे कारावास

नागपूर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भोला मारोती चकोले (३७) असे आरोपीचे नाव असून, तो मौदा तालुक्यातील मोहाडी येथील रहिवासी आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, १३ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडित महिला ही मोहाडीहून मौदा येथील दवाखान्यात एकटीच पायी जात असताना मोटरसायकलने जात असलेल्या भोला चकोले याने तिला थांबवले होते. मौदा येथे सोडून देतो, असे सांगून मोटरसायकलवर बसवले होते.
मारोडी गावाचे काही अंतर केल्यानंतर त्याने या महिलेला बाभळींच्या झाडात नेले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित वृद्धेच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी भादंविच्या ३७६, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक डब्ल्यू.आर. बुराडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. राम मासूरके यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे आणि सहायक फौजदार अरुण भुरे, वासुदेव मस्के यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The accused has been imprisoned for seven years