शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या चामड्यासह आरोपी अटकेत

By admin | Updated: September 13, 2014 02:37 IST

वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भिवापूर येथे बिबट्याच्या चामड्यासह एका आरोपीला रंगेहात अटक केली.

नागपूर : वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी भिवापूर येथे बिबट्याच्या चामड्यासह एका आरोपीला रंगेहात अटक केली. रणजितसिंग जुनी (३०) रा. कच्चेपार ता. सिंदेवाही असे त्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय दुसरा आरोपी श्रावण वाघमारे रा. भिवापूर हा फरार असून, वन अधिकारी त्याचा कसून शोध घेत आहे. माहिती सूत्रानुसार आरोपी श्रावण वाघमारे हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे. त्यानेच सुमारे वर्षभरापूर्वी या बिबट्याची शिकार केली. तेव्हापासून तो चामडे विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात होता. अलीकडेच वन विभागाला त्याची चाहूल लागली. काही वन अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून वाघमारे याच्याशी संपर्क साधला. दरम्यान रणजितसिंग हाही संपर्कात आला. यानंतर चामडे खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला, आणि शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता भिवापूर येथे चामडे देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार नागपूरचे सहायक वनसंरक्षक रमेश खराबे यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक दुपारी २.३० च्या सुमारास नागपूरवरून खाजगी वाहनांनी भिवापूरकडे रवाना झाले. भिवापूर येथे पोहोचताच रणजितसिंग याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. त्याने लगेच भिवापूर येथील आयटीआयसमोर चामड्यासह पोहोचत असल्याचे सांगितले. त्यानुसार वन अधिकारी (बनावट ग्राहक) तेथे पोहोचले. काहीच वेळात रणजितसिंग चामड्यासह तेथे पोहोचला. यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन अटक केली. येथून त्याला वन विभागाच्या रेस्टहाऊसवर नेण्यात आले. तेथे त्याची प्राथमिक चौकशी करून झडती घेण्यात आली. दरम्यान आरोपी रणजितसिंगने त्याला मुख्य आरोपी श्रावण वाघमारे याने चामड्यासह पाठविल्याची कबुली दिली. यानंतर त्याला दक्षिण उमरेड वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची पुन्हा चौकशी करण्यात आली. दुसरीकडे या घटनेची नागपुरातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, रात्री उशिरा दक्षिण उमरेड वन परिक्षेत्र कार्यालयाकडे धाव घेतली. ही कामगिरी एसीएफ रमेश खराबे व मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांच्या नेतृत्वात पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोसावी, आरएफओ ए. आर. शेख, वनपाल तायडे व वनपाल मसराम यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)