शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी केंद्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये विविध विकासकामांवर चर्चा झाली. २८४ किलोमीटर लांबीच्या वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढविण्यात यावी, अशी मागणी यावेळी दर्डा यांनी केली.

गडकरी यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान लक्षात घेता त्यांनी रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न करावेत व नवीन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यासंबंधात चर्चा करावी, असे दर्डा यांनी म्हटले.

यवतमाळपर्यंत न्यावी ब्रॉड गेज मेट्रो

कॉरिडोर-१ अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नागपूर- वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा विस्तार यवतमाळपर्यंत करण्यात यावा, अशी मागणीदेखील विजय दर्डा यांनी यावेळी केली. वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ब्रॉडगेज मेट्रो चालविली जाऊ शकते, अशी भूमिका दर्डा यांनी मांडली.

रुग्णालयांना ऑक्सिजन प्लान्ट अनिवार्य करावा

शहरातील काही रुग्णालयांना नितीन गडकरी यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लान्ट देण्यात आला आहे; परंतु शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट लावणे अनिवार्य करण्याची गरज आहे. सरकारने यासाठी आता राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करावे, अशी मागणी दर्डा यांनी केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन किती आवश्यक आहे, हे सर्वांना पटले आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञानावरदेखील भर देण्यात यावा. ज्या रुग्णालयांना कोरोनाकाळात सरकारकडून मदत करण्यात आली होती, त्या रुग्णालयांनी गरीब व वंचितांना याचा लाभ द्यावा, असेदेखील दर्डा म्हणाले.