अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST2021-07-03T04:06:56+5:302021-07-03T04:06:56+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : सकाळी फिरायला गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ...

Abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : सकाळी फिरायला गेलेल्या १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत परिसरात गुरुवारी (दि. १) सकाळी घडली. पाेलिसांनी यातील आराेपीस अटक केली आहे.

मयूर मेश्राम (२२, रा. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मयूर मूळचा गाेंदियातील रहिवासी असून, ताे कामानिमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत राहताे. पीडित मुलगी गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेली हाेती. ती सकाळी ८.४० वाजेपर्यंत घरी परत न असल्याने वडिलांनी तिचा शाेध घेतला. त्याचवेळी वडिलांना ती एका मुलासाेबत ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत परिसरातील पुलाजवळ दिसली. वडिलांना पाहताच मुलगा पळून गेला हाेता तर ती घाबरलेली हाेती.

वडिलांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली. त्यावेळी तिने त्या मुलाचे नाव मयूर मेश्राम असे सांगितले. त्या दाेघांची १५ दिवसापूर्वी ओळख झाली. त्याने तिला पाणी पिण्याच्या बहाण्याचे त्याच्या खाेलीत नेले. तिथे तिच्यावर इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला व जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे वडिलांनी तिला साेबत घेऊन पाेलीस ठाणे गाठले व तक्रार नाेंदविली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी भादंवि ३७६ (३), ५०६ (ब), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ सहकलम ४,८ अन्वये गुन्हा नाेंदवून आरेापी मयूरला अटक केली.

Web Title: Abuse of a minor girl