शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात, झोप, गुंगीचे औषध मिळतात ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST

- औषधालयात वाढू लागल्या एक्स्पायरी रेट - योग्य औषधांपासून रुग्ण होत आहेत वंचित - लोकमत एक्सक्लुझिव्ह आनंद शर्मा/लोकमत न्यूज ...

- औषधालयात वाढू लागल्या एक्स्पायरी रेट

- योग्य औषधांपासून रुग्ण होत आहेत वंचित

- लोकमत एक्सक्लुझिव्ह

आनंद शर्मा/लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विकसित तंत्रज्ञान जसे उपयोगी तसेच त्याचा वापर उपद्रवी कामासाठीही केला जातो, हे जवळजवळ स्पष्टच आहे. असा हा उपद्रव ऑनलाईन औषध विक्रीतही व्हायला लागला आहे. त्याचा परिणाम औषधालयात (फार्मसी) विकल्या जाणाऱ्या औषधांची एक्स्पायरी रेट वाढायला लागली आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन स्वरूपात गर्भपात, कामोत्तेजक, झोपेच्या आणि गुंगीचे औषध विकले जात आहे. मात्र, याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून कुठलही कारवाई केली जात नाही.

ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णाला मोठ्या प्रमाणात प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी यांनी केला आहे. याचा फटका सर्वसामान्य औषध विक्रेत्यांना बसतो आहे. ऑनलाईनमध्ये विना प्री-स्क्रीप्शननेही औषध उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य औषधालयांमधील अनेक औषधांचा स्टॉक तसाच पडून राहत आहे आणि त्यांची एक्स्पायरी डेट निघून जात असल्याने एक्स्पायरी रेट वाढत आहे. हा एकप्रकारे राष्ट्रीय तोटा असल्याचे गणेशानी म्हणाले.

अन्न व औषधी विक्री अधिनियम १९४० नुसार औषधांची विक्री नोंदणीकृत फार्मासिस्ट्सच्या देखरेखीतच होणे गरजेचे आहे. मात्र, औषधांची ऑनलाईन विक्री नोंदणीकृत फार्मासिस्ट्सच्याच देखरेखीत होत आहे की नाही, याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक रुग्ण प्रलोभनामुळेही ऑनलाईन औषधे खरेदी करून स्वत:चे आरोग्य बिघडवीत आहेत. बरेचदा मिळत्याजुळत्या नावाची औषधे ऑनलाईनच्या माध्यमातून विकली जात आहेत. कधी कधी औषधांचे पर्याय दिले जातात. यामुळे रुग्णांवरील उपचार प्रभावित होतो. असे असतानाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने सरकारकडून ऑनलाईन औषधांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे.

या औषधी विकल्या जात आहेत ऑनलाईन

- सेक्स इम्प्रुव्हमेंट मेडिसिन

- झोपेचे औषध

- गुंगीचे औषध

- गर्भपाताचे औषध

- कामोत्तेजक औषध

कारवाई कधी

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट्सच्या वतीने ऑनलाईन औषधांच्या व्यवसायाविरोधात राष्ट्रस्तरावर सातत्याने विरोध नोंदविला गेला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांनी शासन व प्रशासनाशीही याबाबत चर्चा केली आहे. त्यांना ऑनलाईन औषध विक्रीच्या तोट्याचीही माहिती देण्यात आली आहे. तरीसुद्धा शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.

......