दुसरीसाठी केला पहिल्या प्रेमिकेचा गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST2021-03-21T04:09:19+5:302021-03-21T04:09:19+5:30

नागपूर : दुसरीसाठी पहिल्या प्रेमिकेचा गर्भपात करणाऱ्या आराेपीविराेधात सदर पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जुनी कामठी निवासी नाैशाद ...

Abortion of the first girlfriend done for the second | दुसरीसाठी केला पहिल्या प्रेमिकेचा गर्भपात

दुसरीसाठी केला पहिल्या प्रेमिकेचा गर्भपात

नागपूर : दुसरीसाठी पहिल्या प्रेमिकेचा गर्भपात करणाऱ्या आराेपीविराेधात सदर पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जुनी कामठी निवासी नाैशाद मंसुरी नवशाही (२६) असे आराेपीचे नाव आहे. गाेधनी निवासी २४ वर्षीय प्रेमिकेने ही तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी पाठलाग केला असता सदर आराेपी हा दुसऱ्या युवतीसह ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत असल्याचे लक्षात आले.

पाेलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाेधनी निवासी फिर्यादी युवतीशी आराेपीची २०१९ पासून ओळख हाेती. यानंतर दाेघांमध्ये मित्रता वाढली. वर्षभरानंतर सदर निवासी एका मित्राकडे नेत लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तिच्याशी संबंध स्थापित केले. हे सत्र पुढे अनेक दिवस चालले. यादरम्यान गर्भवती राहिल्याने युवतीने नाैशादला लग्नाबाबत बाेलत हाेती. मात्र आराेपीने गर्भपात केल्यानंतर लग्न करताे असे सांगितले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती झाली. ताे मात्र टाळाटाळ करीत हाेता. त्याच्याबाबत माहिती घेतली असता नाैशादचे दुसऱ्या एका युवतीशी संबंध असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी युवतीने दुसऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्या घराजवळून माहिती घेतली असता ते दाेघे एकत्र राहत असल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे तरुणीने सदर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. युवतीच्या तक्रारीवरून सदर पाेलिसांनी आराेपीविराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Abortion of the first girlfriend done for the second