शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या तपस्येतून विकसित भारताचा नवा अध्याय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 06:56 IST

Narendra Modi In RSS Headquarters: संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी हेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. देशाला ही सूत्रे देणाऱ्या संघाच्या तपस्येतूनच विकसित भारताचा नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नागपूर  - २०४७ साली स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करत असताना विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यावर सर्वांचा भर राहणार आहे. संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी हेच भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार आहे. देशाला ही सूत्रे देणाऱ्या संघाच्या तपस्येतूनच विकसित भारताचा नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रविवारी नागपुरात माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.पंतप्रधान मोदी यांनी साडे चार तासांच्या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसर तसेच दीक्षाभूमीलादेखील भेट दिली. सोलर एक्स्प्लोसिव्हमध्ये टेस्ट रेंज, रनवेचे उद्घाटनही त्यांनी केले.

माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी अवधेशानंदगिरी महाराज, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, माधव नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष निखिल मुंडले, महासचिव डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री हे उपस्थित होते. 

संघाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असते.आपल्यावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले, तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही.कारण ही चेतना जागृत ठेवणारी अनेक आंदोलने भारतात होत राहिली आहेत. शंभर वर्षाअगोदर राष्ट्रीय चेतनेच्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे.संघ भारताच्या संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट आहे. संघ हा देशहितासाठी बाह्य व आंतरिक दृष्टी चेतना जागृत करणारा यज्ञ आहे.

आरोग्य सुविधांबाबत पंतप्रधान म्हणाले...गरिबातील गरिबाला सर्वोत्तम उपचार देण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वंचित समाजातील मुलेदेखील वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू शकतील.आयुष्मान भारत योजनेमुळे कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. यामुळे जनतेचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत.

माधव नेत्रालय महत्त्वाची संस्था ठरेल : मुख्यमंत्रीदृष्टी ही ईश्वराने मानवाला दिलेला मौल्यवान ठेवा आहे. ज्यांच्याकडे दुर्दैवाने ही दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य माधव नेत्रालय गत तीन दशकांपासून करत आहे. नेत्र आरोग्य क्षेत्रात भरीव सेवा देण्याची आवश्यकता आहे. प्रीमियम सेंटरमुळे मध्य भारतातील नेत्र आरोग्य क्षेत्रात सेवा देणारी माधव नेत्रालय ही महत्त्वाची संस्था ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

दृष्टिहीनांची समस्या समाजासाठी शोभनीय नाही: सरसंघचालक डॉ. मोहन भागवतदृष्टिहीनांची समस्या समाजासाठी शोभनीय नाही. संघाच्या कार्यातून समाजात सेवाकार्याची दृष्टी निर्माण होत आहे. समाजानेही यात सहभाग घेतल्याने संघासमोरील अडचणी दूर झाल्या व देशहिताच्या कार्याचा मार्ग सुकर झाला. सेवाकार्य दयाभावाने नव्हे, तर मनात आपुलकीचा भाव उत्पन्न करूनच चालवले जाऊ शकते. सेवेतून जीवनदृष्टी मिळते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर