जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले.. भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:44 IST2025-10-29T16:43:25+5:302025-10-29T16:44:16+5:30

सत्र न्यायालय : सावनेर पोलिसांच्या क्षेत्रातील घटना, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी

A lemon was cut, claiming to have a gene.. A minor mentally ill girl was raped on the pretext of exorcising a demon. | जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले.. भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार

A lemon was cut, claiming to have a gene.. A minor mentally ill girl was raped on the pretext of exorcising a demon.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
भूताची बाधा दूर करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर बलात्कार करणारा ढोंगी बाबा व त्याच्या साथीदाराला मंगळवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, दंड न भरल्यास दोन्ही आरोपींना सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना सावनेर पोलिसांच्या क्षेत्रामधील आहे.

मनोहर मारोती कोल्हे (५८) असे ढोंगी बाबाचे तर, युवराज धनराज सोनटक्के (४३) असे साथीदाराचे नाव आहे. सोनटक्के पहलेपार तर, कोल्हे हेटी येथील रहिवासी आहे. घटनेच्यावेळी पीडित मुलगी करिना (काल्पनिक नाव) १७ वर्षे वयाची होती. तिच्यावर मनोरुग्णालयात उपचार सुरू होते, पण तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. दरम्यान, ३ मे २०२२ रोजी सोनटक्के करिनाच्या पालकांना भेटला व करिनाला भूतबाधा झाली असेल, असा संशय व्यक्त करून तिला कोल्हेकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. कोल्हेकडे बरेच लोक १०० टक्के दुरुस्त झाले आहेत, असेही त्याने सांगितले. त्यामुळे पालकांनी करिनाला कोल्हेकडे नेले. सोनटक्केही त्यांच्यासोबत होता. त्यावेळी कोल्हेने करिनाला जीन लागल्याचे सांगून एक लिंबू कापले व त्यावर कापूर जाळून उतारा काढला. करिनाच्या कंबरेला बांधण्यासाठी काळा दोरा दिला. तसेच, करिनाला एका रात्रीसाठी स्वत:जवळ ठेवून घेतले. त्यानंतर कोल्हे व सोनटक्केने करिनावर बलात्कार केला.

लहानपणापासून अनाथ

करिना लहानपणापासूनच अनाथ आहे. तिची आई २००६ तर, वडील २००८ मध्ये मरण पावले. ती एक वर्षाची होती तेव्हापासून आत्याकडे राहत आहे. आत्याच तिचे पालनपोषण व देखभाल करीत आहे. तिला समाजाकडूनही विशेष मदतीची गरज आहे. परंतु, सैतानी मानसिकतेच्या आरोपींनी तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला.

दोन्ही आरोपी दोषी

सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गतही दोषी ठरवून प्रत्येकी एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले.

Web Title : फर्जी तांत्रिक ने नाबालिग मनोरोगी से बलात्कार किया; सहयोगी भी दोषी.

Web Summary : एक ढोंगी तांत्रिक और उसके साथी को भूत भगाने के बहाने एक नाबालिग से बलात्कार करने के लिए 10 साल की कैद हुई। मनोरोगी पीड़िता का सावनेर में दोनों ने शोषण किया।

Web Title : Fake exorcist rapes mentally ill minor; accomplice also convicted.

Web Summary : A quack exorcist and his accomplice received 10 years imprisonment for raping a minor under the guise of exorcism. The victim, a mentally ill girl, was exploited by the duo in Savner.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.