शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

९० वर्षीय आजीची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:08 IST

नागपूर : जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि नातवाने दिलेल्या हिमतीच्या बळावर ९० वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. त्यांचा ...

नागपूर : जगण्याची तीव्र इच्छा, डॉक्टरांचे परिश्रम आणि नातवाने दिलेल्या हिमतीच्या बळावर ९० वर्षीय आजीने कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दोन दिवसांपूर्वीच त्या आपल्या राहत्या घरी यवतमाळमध्ये परतल्या. कुटुंबीयांसोबत होळीही साजरी केली.

पार्वतीबाई खानझोडे (९०) रा. जिल्हा यवतमाळ, तालुका गांजेगाव, उमरखेड हे त्या आजीचे नाव. त्यांचा नातू अंकुश खानझोडे हे मेडिकलमधील महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, १३ मार्च रोजी आजीला सर्दी, खोकला आणि ताप आला. डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी अहवाल पॉझिटिव्ह आला. घरचे सर्व लोक घाबरले. १५ मार्च रोजी आजीला नागपुरात आणले. १६ मार्च रोजी मेडिकलच्या मेडिसीन कॅज्युअल्टीमध्ये ठेवले. वॉर्डात बेड नसल्याने आजीने ती रात्र कॅज्युअल्टीमध्ये काढली. दुसऱ्या दिवशी तिने खूप गयावया करून मला येथून बाहेर काढा, अशी जिद्द केली. डॉक्टरांना सांगितल्यावर ते माझ्यावर चिडले. त्यांना हीच बाब आजीला समजावून सांगण्याची विनंती केली. डॉक्टरांनी आजीला भेटून रुग्णालयातच राहण्याचे समजावून पाहिले. पण, ती ऐकायला तयार नव्हती. घरी घेऊन चल, मी तिथेच बरी होईन, असा हट्ट धरला. तिच्या हट्टापायी शेवटी डॉक्टरांना माघार घ्यावी लागली. त्यांनी नियमित औषधी, शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीची तपासणी व आहाराकडे विशेष लक्ष देण्याची अट टाकली. आजीने आंगठा (थम्ब) दाखवीत सर्व अटी मान्य केल्या. तिला गावाला नेणे शक्य नव्हते. यामुळे माझ्या खोलीत ठेवले. तुला काहीच होत नाही, अशी हिंमत रोज द्यायचो. १० दिवसांच्या औषधोपचाराने ती बरी झाली. २६ मार्च रोजी तिची पुन्हा कोरोना चाचणी केली. अहवाल निगेटिव्ह आला. तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. त्या डॉक्टरचे आभार मानले. होळी तोंडावर असल्याने गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु तिला बसमध्ये किंवा रुग्णवाहिकेतून जायचे नव्हते तर माझ्या ‘रॉयल एनफिल्ड’ या दुचाकीवर बसून जायचे होते. या प्रवासात तिने आपल्या जीवनाचा आनंद घेतला. घरी गेल्यावर कुटुंबीयांनी औक्षण करीत टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले.