शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

४० तासांत ८ बळी !

By admin | Updated: April 26, 2016 02:06 IST

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालविणारे निरपराध

नागपूर : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालविणारे निरपराध नागरिकांचे बळी घेत आहेत. या दोन अपघातामुळे गेल्या ४० तासांत अपघातात ठार झालेल्यांची संख्या ८ झाली आहे. मोरभवन परिसरात सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भीषण अपघात घडला. लकीनारायण कालीचरण कुर्मी (वय ६४) आणि त्यांची पत्नी लीलाबाई (वय ६०, दोघेही रा. इंदिरा मातानगर, एमआयडीसी) उपचारासाठी मेडिकलमध्ये गेले होते. हे गरीब दाम्पत्य घरी जाण्यासाठी मोरभवन बसस्थानकावर आले. दोघेही एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडत असताना एसटी बसने (एमएच ४०/एन ८७१८) लीलाबार्इंना चिरडले. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी पोलिसांनी लकीनारायण कुर्मी यांच्या तक्रारीवरून आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. सोमवारी क्वॉर्टर परिसरातील रहिवासी रामदास सोनबाजी गाडगे (वय ६४) हे पत्नीसह रविवारी सकाळी ११.१५ ला चिंचभुवन परिसरात लग्नाला जात होते. सोनेगावच्या उड्डाणपुलावर त्यांच्या प्लेझर दुचाकीला एका कारचालकाने कट मारला. त्यामुळे गाडगे दाम्पत्य खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास डॉक्टरांनी रामदास गाडगे यांना मृत घोषित केले. जितेंद्र नामदेवरावजी डांगोरे (वय ३६, रा. पारडसिंगा,ता, काटोल) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)कसे थांबणार अपघात एकीकडे शहरातील रस्ते गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे बेदरकारपणे वाहन चालविणारे या रस्त्यावर रक्ताच्या चिरकांड्या उडवीत आहेत. अवघ्या ४० तासांत उपराजधानीच्या विविध भागात एका चिमुकल्यासह ८ जणांचे बळी गेले तर, ९ जण गंभीर जखमी आहेत. मृतात धमतीर(छत्तीसगड)मधील लोढा परिवारातील ४ सदस्य, दिघोरी नाक्याजवळचा सम्यक देवीदास मेश्राम, फौजिया रशीद अली ही यशोधरानगरातील तरुणी तसेच उपरोक्त दोघांचा समावेश आहे. जखमींमध्ये लोढा परिवारातील ५ जण, फौजियाच्या बहिणीचा पती, रामदास गाडगे यांची पत्नी आणि गोरक्षणसमोर भरधाव कारचालकाने धडक दिलेले दोघे दुचाकीस्वार यांचा समावेश आहे. या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कसे थांबणार अपघात, असा प्रश्न चर्चेला आला आहे.