शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 01:57 IST

‘डिजिटल अरेस्ट’ करत निर्माण केली दहशत...

नागपूर : दिल्ली स्फोटाशी निगडीत मनी लॉंड्रिंग प्रकरणात नाव आल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी एका ७१ वर्षीय वृद्धाला टार्गेट केले. यामुळे दहशतीत आलेल्या संबंधित सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याकडून गुन्हेगारांनी २९ लाख रुपये उकळले. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माधवननगर निवासी असलेल्या संबंधित वृद्धाला ११ नोव्हेंबर रोजी ८९२२०६३२३५ या क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. समोरील व्यक्तीने मुंबई पोलीस मुख्यालयातून उपनिरीक्षक सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. त्याने दिल्ली स्फोटाशी निगडीत मनी लॉंड्रिंगमध्ये वृद्धाचे नाव आल्याचा दावा केला. काही वेळाने आणखी एक व्हिडीओ कॉल आला व समोरील व्यक्तीने कॅमेरा सुरू ठेवण्यास सांगितले. जर सहकार्य केले नाही तर अटक करण्यात येईल अशी धमकी समोरील व्यक्तींनी दिली.

२१ नोव्हेंबरपर्यंत सातत्याने पती-पत्नीच्या मोबाईल व्हिडीओ कॉल येत होते. आरोपी स्वत:ला दिल्ली-एनआयए तसेच लखनऊ एटीएसमधून बोलत असल्याचे सांगत होते. आरोपींनी वृद्धाकडून मालमत्तेचे सर्व तपशील मागून घेतले. भितीपोटी वृद्धाने त्यांना सर्व माहिती दिली. आरोपींनी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा बनावट अटक वॉरंट पाठविला. त्यानंतर आरोपींनी पैशांची मागणी केली. वृद्धाने एफडी मोडून आरोपींना २९.३० लाख रुपये पाठविले. मात्र त्यानंतरही आरोपी पैसे मागतच होते. वृद्धाने आता पैसे संपल्याचे सांगितले.

तेव्हा आरोपींनी त्यांना मालमत्ता किंवा पेंशनवर कर्ज घ्या असे उत्तर दिले. त्यानंतर आरोपींनी फोन करणे बंद केले. वृद्धाने फोन करून पैसे परत कधी मिळतील असे विचारले असता आरोपींनी २४ नोव्हेंबरला पैसे परत देऊ असे सांगितले. त्यांचे फोन बंद झाल्याने वृद्धाने सुटकेचा नि:श्वास घेतला व बाहेरगावी राहणाऱ्या मुलाला हा प्रकार सांगितला. आपल्या वडिलांसोबत फसवणूक झाल्याचे मुलाला लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्धाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या खात्यात पैसे पाठविले त्याचा मनी ट्रेल काढून पोलीस आरोपींचा माग घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur: Elderly man loses ₹29 lakhs in cyber fraud.

Web Summary : A 71-year-old retired bank officer in Nagpur was defrauded of ₹29 lakhs by cybercriminals posing as police. They falsely claimed his involvement in a Delhi blast money laundering case, extorting money under threat of arrest. A police complaint has been registered.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस