शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

६ शिक्षक, वर्ग ५ ते १० अन् विद्यार्थी २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना, जिल्हा परिषदेच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ६ शिक्षक आणि २ विद्यार्थी ...

नागपूर : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असताना, जिल्हा परिषदेच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ६ शिक्षक आणि २ विद्यार्थी अशी अवस्था आहे. २०१८ पासून या शाळांची अशीच अवस्था असून, ही बाब आता उघडकीस आल्यानंतर त्या शिक्षकांचे तडकाफडकी इतर शाळेत समायोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

पटवर्धन हायस्कूल ही वर्ग ५ ते १२ पर्यंतची शाळा आहे. या शाळेच्या आस्थापनेवर कनिष्ठ व्याख्याता २, उच्च श्रेणी सहा. शिक्षक ४, निम्न श्रेणी सहायक शिक्षक १, शिक्षकेतर कर्मचारी ३, तांत्रिक विभागाचे ४ कर्मचारी व २ अपंग समावेशित माध्यमिक विशेष शिक्षिका असे एकूण १६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या शाळेतील ५ ते १० पटावर केवळ २ विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेची पटवर्धन हायस्कूल ही शहरात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचेही समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील २ विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन केल्यास ९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरतात. त्यामुळे या शिक्षकांचे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळेतील रिक्त पदांवर समायोजन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

याचसोबत काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ८ पदे मान्य असून, १७ शिक्षक कार्यरत आहेत. जि.प. हायस्कूल जवळी येथे ६ शिक्षक मान्य असून, ८ पदे कार्यरत आहेत. जि.प. हायस्कूल पाचगाव, बोथिया पालोरा, हिंगणा, मांढळ, कोंदामेंढी या शाळांमध्ये मान्य पदांपेक्षा कार्यरत पदांची संख्या जास्त आहे.

- जिल्हा परिषदेच्या १४ शाळांचा आढावा घेतला असता, येथे १०४ शिक्षकांचे पद मान्य आहे, तर १२१ शिक्षक अतिरिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयाच्या ३५ शिक्षकांची गरज आहे. त्यापैकी २५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे गणित आणि विज्ञान शिक्षकांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. १७ पैकी १४ शिक्षकांचे समायोजन करणार आहोत.

भारती पाटील, सभापती, जि.प. शिक्षण समिती