शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

६ जिल्हे होणार ‘पाणीदार’, वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

गोपालकृष्ण मांडवकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार ...

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या या प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे. केवळ सिंचनच नव्हे तर, पेयजल, उद्योग, मत्स्योत्पादन, जलऊर्जा निर्मिती, पर्यटन, कृषी उत्पादकता अशा सर्व माध्यमातून हे उत्पन्न वाढण्यासोबतच रोजगार निर्मिती वाढविण्याचे नियोजन आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यातील १५ तालुके सिंचनाच्या बाबतीत सधन होतील, यातून विदर्भाची अर्थव्यवस्था सुधारेल असे नियोजन आहे.

या नदीजोड प्रकल्पातून ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही, उमरेड, हिंगणा आणि नागपूर या चार तालुक्यातील ९२,३२६ हेक्टर शेतीला सिंचनाला लाभ मिळणार आहे. या सोबतच, वर्धा जिल्ह्यात सेलू, आर्वी व वर्धा तालुक्यात ५६,६४६ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात धामणगाव, नांदगाव (खं.) तालुक्यात ८३,५७१ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात नेर व बाभूळगाव तालुक्यात १५,८९५ हेक्टर, अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात ८४,६२५ हेक्टर आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव आणि मोताळा तालुक्यात ३८,२१४ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन आहे.

या प्रकल्पातून वर्षाला १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पाचही तालुक्यातील पीकपद्धती वेगळी आहे. आज सिंचनाच्या सुविधांअभावी पुरेसे उत्पादन घेता येत नाही. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांमुळे तर अकोला जिल्हा दुष्काळामुळे चर्चेत आहे. या नदीजोड प्रकल्पातून संत्री, कॉटनबेल्टला नवसंजीवनी मिळू शकते. शेतीच्या उत्पादनातून अन्य प्रक्रिया उद्योग भविष्यात उभारले जाऊन त्यातून मोठी रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे. पर्यटनवाढीला चालना देण्यासोबतच पाण्यामुळे अडलेला औद्योगिक विकासही साधला जाऊ शकतो. प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकते.

...

आराखडा तयार, निधीची प्रतीक्षा

या प्रकल्पाचा आराखडा २०१८ पासून तयार आहे. आता मंजुरीची आणि निधीची तेवढी प्रतीक्षा आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रकल्पाची किमतही वाढणार असल्याने राज्य सरकार आणि जनप्रतिनिधी कधी मनावर घेणार, हे आता महत्त्वाचे आहे.

...

* लाभक्षेत्रातील पिके

नागपूर जिल्हा - सोयाबीन, कापूस

वर्धा जिल्हा-कापूस, सोयाबीन, केळी, (सेलूमध्ये संत्री, मोसंबी), भाजीपाला

अमरावती जिल्हा-संत्री, कापूस

यवतमाळ जिल्हा-कापूस

अकोला जिल्हा-कापूस, सोयाबीन

बुलढाणा जिल्हा-कापूस, ज्वारी, उन्हाळी कांदा

...

* तालुके व सिंचनाचा लाभ

नागपूर जिल्हा ९२,३२६ हेक्टर : कुही (४४,२५४ हे.), उमरेड (३३,५५८ हे.), हिंगणा (९,६९७ हे.), नागपूर (४,८१७ हे.)

वर्धा जिल्हा ५६, ६४६ हेक्टर : सेलू (२४, ३४९ हे.), आर्वी (३०,६५९ हे.), वर्धा (१,६३८ हे.)

अमरावती जिल्हा ८३,५७१ हेक्टर : धामनगाव (३३,६०४ हे.), नांदगाव (खं.) (४९,९७६ हे.)

यवतमाळ जिल्हा १५,८९५ हेक्टर : नेर (४,९९८ हे.), बाभूळगाव (१०,८९७ हे.)

अकोला जिल्हा ८४,६२५ हेक्टर : बार्शी टाकळी (५०,७५६ हे.), अकोला (३३,८६९ हे.)

बुलढाणा जिल्हा ३८, २१४ हेक्टर : शेगाव (३०,०४४ हे.), मोताळा (८,१७० हे.)

...

* उत्पन्नाचे वार्षिक स्त्रोत

कृषी उत्पादन - २,१३३ कोटी ८१ लाख रु.

पाणी कर (सिंचन सेवा शुल्क) - ५,५६९ कोटी रु.

पेयजल पाणीपुरवठा - ११२ कोटी रु.

औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरठा-९५ कोटी २८ लाख रु.

मासेमारी-३२ कोटी ३० लाख रु.

कॅनल प्लँटेशन - ४८ कोटी ६६ लाख रु.

जलऊर्जा निर्मिती- १८८४ मे.व्हॅ.

एकूण प्रस्तावित उत्पन्न-११,७९९ कोटी ५२७ लाख रु.

...

* लिंकमधून पाण्याचा वार्षिक वापर

सिंचन - १२८६ द.ल.घ.मी.

पाणीपुरवठा योजना - ३२ द.ल.घ.मी.

औद्योगिकरण - ३९७ द.ल.घ.मी.

प्रस्तावित वार्षिक वापर - १,७७२ द.ल.घ.मी.

...