शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांच्या यादीत घोळ

By admin | Updated: May 28, 2014 00:56 IST

एका ठिकाणी दोन वर्ष हा निकष लावून राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी या यादीतही बराच घोळ असल्याचे पुढे आले आहे.

दोन वर्षांंचा निकष : तीन वर्ष होऊनही अनेक अधिकारी एकाच जागी

यवतमाळ : एका ठिकाणी दोन वर्ष हा निकष लावून राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी या यादीतही बराच घोळ असल्याचे पुढे आले आहे. एकाच ठिकाणी तीन वर्ष झालेले अनेक अधिकारी राज्यात आजही कायम आहेत. त्यामुळे बदल्यांच्या या यादीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री ४९२ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली. परंतु या यादीतील अनेक नावे डोळे विस्फारणारी आहेत.

एकीकडे दोन वर्ष झाले म्हणून पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी केली गेली. तर दुसरीकडे तीन वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही काही पोलीस निरीक्षकांना आहे त्याच ठिकाणी ठेवले गेले आहे. गृहजिल्ह्यात नियुक्ती देऊ नये असे आदेश असताना औरंगाबाद शहरात एका पोलीस निरीक्षकाला नियुक्ती दिली गेली आहे. अनेक अधिकार्‍यांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बदल्या झाल्या असताना त्यांना पुन्हा बदलविण्यात आले आहे. हा घोळ पाहता महासंचालक कार्यालयाने दोन वर्षांच्या निकषातून मर्जीतील अधिकार्‍यांना वगळले तर नाही ना अशी शंका पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे. काही विशिष्ट अधिकार्‍यांना हेतुपुरस्सर की-पोस्टवर ठेवले जात आहे. विदर्भातही अशी अनेक उदाहरणे आहेत.

प्रत्येकच यादीत गोंधळ

बढत्या असो वा बदल्या प्रत्येकच यादीत गोंधळ पहायला मिळत आहे. महासंचालकांनी काही डेस्क अधिकार्‍यांवर कारवाई करून काहींच्या बदल्या केल्यानंतरही घोळ कायम असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. तीन दिवसांपूर्वी ९५ पोलीस निरीक्षकांच्या बढतीची यादी जारी केली.

मात्र प्रत्यक्षात त्यातून तीन नावेच गहाळ होती. ही चूक लक्षात आल्यानंतरही आस्थापना महानिरीक्षक कार्यालयातील संबंधित महिला अधिकार्‍याची मुजोरी मात्र कायम होती. (जिल्हा प्रतिनिधी)