शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: July 5, 2014 02:16 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मूल्यांकनाच्या कार्यात गैरहजर राहणाऱ्या किंवा ..

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मूल्यांकनाच्या कार्यात गैरहजर राहणाऱ्या किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गतच शुक्रवारी ४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. या प्राध्यापकांमुळे मूल्यांकनाची प्रक्रिया संथ झाली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा प्रश्न विद्यापीठाकडून उपस्थित करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्राध्यापक अभियांत्रिकी शाखेचेच आहेत.नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागासाठी मूल्यांकनाला होणारा उशीर ही नेहमीचीच डोकेदुखी आहे. विद्यापीठात मूल्यांकनासाठी दरवर्षी निरनिराळ्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे चालावी आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सहकार्य करणे ही प्राध्यापकांची जबाबदारीच असते. विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या ‘स्पॉट’ मूल्यांकन केंद्रांवर निर्धारित वेळापत्रकानुसार जाणे व मूल्यांकन करणे हे देखील प्राध्यापकांकडून अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक प्राध्यापक हे मूल्यांकनासाठी एकतर येतच नाही किंवा अनियमितपणे येतात. त्यामुळे मूल्यांकनाच्या कामाला फटका बसतो व निकाल लावण्यास उशीर होतो. यंदा परीक्षांच्या निकालाच्या गाडीने हवा तसा वेग घेतलेला नाही. हीच बाब लक्षात घेऊन परीक्षा नियंत्रकांनी मूल्यांकनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांना मागील आठवड्यातच एका तातडीच्या अधिसूचनेद्वारे ‘अल्टिमेटम’ दिला होता. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ३२ (५) (ग)नुसार मूल्यांकन व परीक्षेसंदर्भातील कामात बेजबाबदारपणा, अकार्यक्षमता, हलगर्जीपणा दाखविणे हा गंभीर दु:व्यवहार मानण्यात येतो. आॅर्डनन्स क्रमांक १७ नुसार शिस्तीचा भंग करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईचा विद्यापीठाला अधिकार आहे. या अधिसूचनेला प्राध्यापकांनी गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी विद्याशाखेच्या ४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)