शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

३१६७ प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 22, 2016 02:51 IST

महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या

५७०८ प्रकल्पग्रस्तांना मिळाला हक्क : चंद्रपूरमध्ये सर्वाधिक संधी नागपूर : महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, भुसावळ आणि नाशिक येथील औष्णिक वीज केंद्राच्या प्रकल्पाकरिता ज्या लोकांची जमीन संपादित करण्यात आली त्या एकूण ८८७५ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी ३० जून २०१६ पर्यंत ५७०८ प्रकल्पग्रस्त उमेदवारांना महानिर्मितीने नोकरीत समावून घेतले आहे. यात चंद्रपूरमध्ये सर्वाधिक प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे. ३१६७ प्रकल्पग्रस्त अजूनही प्रतीक्षेत आहेत. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती विचारली होती. महानिर्मितीने त्यांना यासंदर्भात माहिती उपलब्ध करून दिली आहे. महानिर्मितीनीच्या चंद्रपूर येथील वीज केंद्रात सर्वाधिक २६६९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. चंद्रपूर येथे एकूबण ३४०६ प्रकल्पग्रस्त होते. त्यापैकी ७३७ प्रकल्पग्रस्तांना अजूनही सामावून घेण्यात आलेले नाही. त्यानंतर कोराडी येथील वीज केंद्रात १८९८ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आले. १५२ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. भुसावळ येथे ६६४ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले, ६९६ प्रतीक्षेत, नाशिक येथे ३६५ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले. १२२७ प्रतीक्षेत आहेत. खापरखेडा येथे ७५ व पारस येथे ३९ प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले असून अनुक्रमे ११० व २४५ प्रकल्पग्रस्त प्रतीक्षेत आहेत. याशिवाय पारस येथील दोन प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी एकमुश्त ५ लाख रुपये प्रदान करण्यात आले. ज्या उमेदवारांना तांत्रिक अर्हता किंवा इतर कारणांमुळे सामावून घेता आले नाही, अशा प्रकल्पग्रस्त उमेदवारांना आयटीआयचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी दोन हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाते. ज्यांना आयटीआयमध्ये प्रवेश मिळत नाही, अशा उमेदवारांना पोफळी जल विद्युत केंद्र नाशिक व भुसावळ विद्युत केंद्राच्या आवारात मुलभूत व अनुषांगिक सूचना केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात उमेदवारांना प्रथम दोन वर्षाकरिता दोन हजार रुपये दरमहा व तिसऱ्या वर्षाकरिता सहा हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जते. तसेच आयटीआय उत्तीर्ण प्रकल्पग्रस्तांना प्रगत कुशल प्रशिक्षणावर सामावून घेण्यात येते. तेव्हा त्यांना आठ हजार रुपये दरमहा इतके विद्यावेतन दिले जाते. दरवर्षी ३० जून व ३१ डिसेंबर या दिवशी तीन वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. (प्रतिनिधी)