शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

२६ कोटींचे अनुदान वाटप

By admin | Updated: July 10, 2014 00:46 IST

प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते.

जिल्हा परिषद : पोषण आहाराचा दोन लाख विद्यार्थ्यांना लाभ नागपूर : प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थिती वाढावी आणि शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने केंद्र व राज्य पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना प्रभावीपणे राबविली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील १,९०,००० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी २६ कोटींचे अनुदान वाटप करण्यात आले. केंद्र व राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. मागील वर्षात जिल्हा परिषदेच्या १५८० व अनुदानित खासगी ३६९ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. ही योजना अधिक सक्षमतेने राबविली जावी, यासाठी योजनेतील त्रुटी, अडचणी व उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोषण आहार विभागाचे जिल्हा निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिली.या योजनेचा उद्देश सफल व्हावा, यासाठी तांदूळ व इतर साधनसामग्रीच्या साह्याने भिन्न प्रकारचे मेनू तयार केले जातात. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना योजनेचा लाभ मिळावा, यादृष्टीने पोषण आहार विभागाने पुढील वर्षाचे नियोजन केले आहे. परिसरात उपलब्ध भाजीपाला व इतर बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर आहारात आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल अशा स्वरूपाचा मेनू दिला जातो. सोबतच आहारातून आवश्यक ती प्रथिने व उष्मांक मिळतील याची खबरदारी घेतली जाते. पोषण आहारासाठी लागणारे इंधन व भाजीपाला पुरविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर होती. आता ती महिला बचत गटांवर सोपविण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनी दिली. (प्रतिनिधी)