शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
3
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
4
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
5
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
6
मकर संक्रांत २०२६: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
7
अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
8
संतापजनक! लेकीला प्रियकरासोबत 'तसल्या' अवस्थेत पाहिलं अन् चिडलेल्या कुटुंबानं बेदम मारलं; दोघांचा मृत्यू 
9
"माझ्यामुळेच NATO अस्तित्वात, आता ग्रीनलँडवरही आमचाच ताबा हवा" Donald Trump यांचा मोठा दावा!
10
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
11
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
12
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
13
Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
14
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
15
"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
16
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
17
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
18
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
19
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
20
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये २५५ शाळांचा आरटीईला ठेंगा, तीन दिवसांत 'कारणे दाखवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:56 IST

हिंगणा-काटोलसह शहरातील शाळांचे वास्तव : विद्यार्थ्यांचे हक्क का हिरावता?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर आणि ग्रामीण भागात शिक्षण व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्षाचे धक्कादायक चित्र आता उघड झाले आहे. शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा लागू होऊनही नागपूर जिल्ह्यातील तब्बल २५५ खासगी अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी 'आरटीई'ची अनिवार्य नोंदणीच घेतली नाही. परिणामी, वंचित व गरजू घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील हक्क थेट बाधित होत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६२९ शाळा आरटीई अंतर्गत नियमितपणे नोंदणीकृत असूनही, २५५ शाळा नियमांचे उल्लंघन करून कोणतीही मान्यता न घेता शैक्षणिक कार्य चालवत आहेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित नेते, ट्रस्ट, तसेच 'शिक्षणसम्राटां'च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थांचाही समावेश असल्याचे समजते.

या गंभीर दुर्लक्षाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, तीन दिवसांच्या आत कारणमीमांसा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 'आरटीई मान्यता का घेतली नाही? नोंदणी न करता शैक्षणिक कार्य कसे सुरू ठेवले?' याबाबत स्पष्ट खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

काही शाळांनी तर प्रथम नोंदणीही केली नाही!

शासन निर्णय ३१ डिसेंबर २०१३ नुसार, सर्व माध्यमांतील प्राथमिक शाळांसाठी आरटीई नोंदणी बंधनकारक आहे. एकदा नोंदणीनंतर प्रत्येक तीन वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते. मात्र, आश्चर्य म्हणजे काही शाळांनी प्रथम नोंदणीसुद्धा केली नाही, असे शिक्षण विभागाचे निरीक्षण आहे. या निष्काळजीपणामुळे शिक्षण विभागाला मिळणारा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडाल्याचे अधिकारी सांगतात.

नोंदणी का टाळली?

२०२२ ते २०२५ या तीन शैक्षणिक वर्षांच्या आकडेवारीत शहरातील शाळांची संख्या सर्वाधिक असली तरी, हिंगणा, काटोल आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील अनेक शाळांनीही आरटीई नोंदणी टाळल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षणाच्या संर्धीचे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. 

विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा

नियमांचे हे सर्रास उल्लंघन म्हणजे वंचित समाजघटकातील मुलांच्या शिक्षणाच्या संधींवर घट्ट पडदा टाकण्यासारखे आहे. 'शैक्षणिक हक्काला ठेंगा दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार', असा इशाराही विभागाने दिला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 255 Nagpur Schools Defy RTE, Face Show-Cause Notices

Web Summary : 255 Nagpur schools violated RTE norms, failing to register. This denies education to disadvantaged students. The education department issued show-cause notices demanding explanations for non-compliance within three days, threatening strict action.
टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूरEducationशिक्षण