शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मे महिन्यात २५ कोटी कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, सीटु नेते डॉ. डी. एल. कराड यांची माहिती

By दयानंद पाईकराव | Updated: February 23, 2025 20:38 IST

Nagpur News: केंद्र शासनाने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कामगारांचे शोषण करण्यात येत आहे. या विरोधात १८ मार्चला दिल्लीत कामगारांचे देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात मे महिन्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

- दयानंद पाईकराव नागपूर - केंद्र शासनाने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कामगारांचे शोषण करण्यात येत आहे. या विरोधात १८ मार्चला दिल्लीत कामगारांचे देशव्यापी संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात मे महिन्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मे महिन्यात देशातील २५ कोटी कामगार रस्त्यावर उतरून कामगार विरोधी धोरणांचा विरोध करतील, अशी माहिती सीटुचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या वतीने कॉटन मार्केट येथील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. डॉ. कराड म्हणाले, केंद्र शासनाने कामगार विरोधी कायदे रद्द करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात २ लाख तर देशात २५ लाख पदे रिक्त आहेत. परंतु ही पदे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. यात कामगारांचे अतोनात शोषण करण्यात येत आहे. कामाच्या मोबदल्यात कामगारांना अत्यल्प मानधन मिळत आहे. बांधकाम कामगार, घर कामगारांना वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांसाठी रविवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

यात निवृत्तीनंतर आशा व गटप्रवर्तकांना ५ लाख ग्रॅच्युईटी, १० हजार पेन्शन द्यावी, त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. सोमवारी २४ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, अमृत मेश्राम, रामदास खवसे, लक्ष्मी कोट्टेजवार, रंजना पौनीकर, उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, माया कावडे उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारीnagpurनागपूर