व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 02:45 PM2022-09-14T14:45:42+5:302022-09-14T14:52:46+5:30

यावर्षी झालेल्या जाॅब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ओरॅकल कंपनीने व्हीएनआयटीच्या १४ विद्यार्थ्यांना तब्बल ६४ लक्ष रुपये पॅकेजचे जाॅब दिले आहेत.

20th convocation of VNIT tomorrow; 1375 students will receive their degrees in the presence of the Army Chief | व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

व्हीएनआयटीचा उद्या २० वा दीक्षांत समारंभ; लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत १३७५ विद्यार्थ्यांना मिळणार पदवी

Next

नागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजी (व्हीएनआयटी) चा २० वा दीक्षांत समारंभ येत्या १५ सप्टेंबर राेजी आयाेजित करण्यात आला आहे. यावर्षी पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आदी मिळून १३७५ पदवी प्रदान केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनाेज पांडे व सीएसआयआरचे माजी महासंचालक डाॅ. रघुनाथ माशेलकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

व्हीएनआयटीचे प्राचार्य डाॅ. पी.एम. पडाेळे यांनी पत्रपरिषदेत या समारंभाची माहिती दिली. संस्थेच्या नूतनीकरण झालेल्या सभागृहात हा भव्य समाराेह आयाेजित केला जाणार आहे. समाराेहादरम्यान ७० डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी, ३७५ मास्टर ऑफ टेक्नालाॅजी, ५६ मास्टर ऑफ सायन्स, ५५ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आणि विविध अभियांत्रिकी शाखांमधील ८१९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. याशिवाय व्हीएनआयटी विद्यार्थी व संशाेधन अभ्यासकांना ४७ पदके आणि गुणवंत शैक्षणिक कामगिरीसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रपरिषदेत रजिस्ट्रार एस. आर. साठे, रिसर्च डिन डाॅ. माधुरी चाैधरी, प्रशासकीय डिन डाॅ. ए. एस. गांधी व जनसंपर्क सहायक अधिष्ठाता डाॅ. रश्मी उड्डनवाडीकर उपस्थित हाेते.

१४ विद्यार्थ्यांना चक्क ६४ लाखांचे पॅकेज

यावर्षी झालेल्या जाॅब प्लेसमेंटमध्ये आंतरराष्ट्रीय ओरॅकल कंपनीने व्हीएनआयटीच्या १४ विद्यार्थ्यांना तब्बल ६४ लक्ष रुपये पॅकेजचे जाॅब दिले आहेत. यामध्ये ९ काॅम्प्युटर सायन्स, ३ इलेक्ट्रानिक्स व २ इलेक्ट्रीकल इंजिनिअर्सचा समावेश आहे. २०२१-२२ या वर्षासाठी ३०० हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट राबविली. यामध्ये युजी व पीजीच्या १२४८ विद्यार्थ्यांना जाॅब ऑफर केली असून ९३६ विद्यार्थ्यांना स्थान मिळाले.

यावर्षीची कामगिरी

- गुगलनेही यावेळी प्लेसमेंट राबवत ५ विद्यार्थ्यांची निवड केली.

- एनआयआरएफ २०२२ द्वारे व्हीएनआयटीला अभियांत्रिकी श्रेणीमध्ये ३२ वे व आर्किटेक्चरमध्ये ८ वे स्थान मिळाले.

- इंडिया टुडे रॅंकिंगमध्ये संस्था देशात २० व्या स्थानावर आहे.

- व्ही.आर. जामदार सीमेन्स सेंटर फाॅर एक्सलन्स व ॲम्फी थिएटरचे उद्घाटन झाले.

- बाॅयाेमेडीकल अभियांत्रिकी व तंत्रज्ञान नवाेपक्रम केंद्राचे उद्घाटन.

- दीक्षांत समारंभादरम्यान गेस्ट हाऊस व हेल्थ सेंटरचे उद्घाटन हाेईल.

- ऑलिम्पिक स्तराचे स्विमिंग पूल प्रस्तावित. सुविधा संकुल व विश्व लाईफ स्किल क्लब माजी विद्यार्थ्यांकडून प्रायाेजित.

Web Title: 20th convocation of VNIT tomorrow; 1375 students will receive their degrees in the presence of the Army Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.