२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 20:46 IST2025-11-20T19:45:43+5:302025-11-20T20:46:08+5:30
Nagpur : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला

200 women killed accuse in court; What was happening in Malegaon happened in Nagpur
Crime News: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी सगळीकडे होत आहे. संपूर्ण महाराष्टातील नागरिक या घटनेविरोधात संतप्त आहेत. आरोपीची पाशवी वृत्ती पाहता शिक्षेसाठी त्याला लोकांमध्ये सोडून देण्याची मागणी होत आहे.
याच घटनेवरून आठवण होते नागपूरमध्ये घडलेल्या अशा आक्रोशाची ज्याने संपूर्ण देशाला सुन्न करून सोडले होते. १३ ऑगस्ट २००४ रोजी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात एक अत्यंत खडतर आणि संवेदनशील घटना घडली होती. अंदाजे २०० महिला, ज्या अनेक वर्षांपासून अकू यादव नावाच्या गुंडाच्या जाचाला कंटाळल्या होत्या त्यांनी त्याच्यावर कोर्टातच हल्ला करून त्याची हत्या केली होती.
अकू यादव हा नागपूरमधील कस्तुरबा नगर झोपडपट्टीमध्ये राहत होता, आणि त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार, हत्या, ब्लॅकमेलिंग, आणि धमक्या यासारख्या गुन्ह्यांचा आरोप होता. त्याच्यावर वर्षांनुवर्षे गुन्हे दाखल झाले होते, पण त्याला अनेक वेळा जामीन मिळत होता. ' पोलीस माझे काहीच बिघडवू शकत नाहीत' म्हणत तो महिलांना धमकवायचा त्यांच्यावर अत्याचार करायचा.
शेवटी न्यायालयात त्याच्या जामीन सुनावणीवेळी, महिलांचा राग आणि निराशा टोकाला पोहचली. त्या महिलांनी मिरची पावडर, दगड, आणि सुरी यांसारखी साधने घेऊन न्यायालयात हजार झाल्या आणि त्याच्यावर हल्ला केला. काही महिलांनी अकू यादवचे जननेंद्रिय कापल्याचा देखील दावा केला जातो. त्याच्या शरीरावर अंदाजे ७० पेक्षा जास्त वार केले गेले होते, आणि तो १५ मिनिटांतच मरण पावला होता. काही महिला म्हणतात की त्यांनी हा निर्णय कायद्याचा विचार न करता घेतला; कारण बर्याच वर्षांपासून न्याय व्यवस्था आणि पोलिसांकडून त्यांना सुरक्षा मिळत नव्हती.
या हल्ल्यानंतर सर्वच महिलांनी आम्हाला अटक करा अशी मागणी केली होती पण त्यातील काहीच महिलांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन तपासात आणि सुनावणीतून अनेक आरोपींना दोष सिद्ध होऊ शकला नसल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले. तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या घटनेवर बोलतांना म्हणाले की हा प्रकार “ कायद्याच्या कार्यक्षमतेतील कमतरता ” आणि “न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा तुटवडा” यामुळे घडला होता.
ही घटना केवळ एक क्रूर प्रतिशोध नव्हे, तर समाजातील महिलांची कायमची असुरक्षा आणि न्याय न मिळाल्याचा एक मोठा आवाज होती. परंतु, हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की कायदा आपल्या हातात घेणे ही योग्य पद्धत नाही कारण यामुळे कायदेशीर ठराविकता, जबाबदारी आणि पायाभूत संविधानात्मक मूल्ये धोक्यात येतात.