शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटींचे गारमेंट क्लस्टर!

By admin | Updated: June 2, 2015 02:05 IST

केंद्र सरकारच्या योजनेनुसार नागपुरात गारमेंट क्लस्टरची (समूह) स्थापना झाली असून त्या माध्यमातून हजारोंना रोजगार

मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरकेंद्र सरकारच्या योजनेनुसार नागपुरात गारमेंट क्लस्टरची (समूह) स्थापना झाली असून त्या माध्यमातून हजारोंना रोजगार मिळाला आहे. पहिल्याच वर्षी उपयोगकर्त्यांकडून शुल्क स्वरूपात जवळपास ७० लाख रुपये मिळाले आहे. अद्ययावत मशिनरी आणि आधुनिक सुविधांमुळे नागपुरात गारमेंट उत्पादन उद्योगाची भरभराट होत आहे. गारमेंट उत्पादक एकाच छताखाली१६ कोटी रुपयांचे गारमेंट क्लस्टर आहे. उत्तर नागपुरात उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रामागे एक एकर जागेत ‘आॅरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूर’ या नावाने क्लस्टरची स्थापना पाच वर्षांपूर्वी झाली. जिल्ह्यात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल, पण विखुरलेल्या गारमेंट उत्पादकांना एकाच छताखाली आणून त्यांना अत्याधुनिक मशीनद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रशिक्षण देण्याचा क्लस्टरचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशात हे क्लस्टर यशस्वी ठरले आहे. क्लस्टरचे तीन विभागात कार्यएकूण १६ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या क्लस्टरमध्ये ४२ जणांचे ३ कोटींचे समभाग तर केंद्र सरकारचा १३ कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकार मशीन खरेदीसाठी पैसा दिला आहे, तर जागा आणि इमारतीचे बांधकाम कंपनीने केले आहे. या क्लस्टरमध्ये एम्ब्रायडरी, वॉशिंग व फिनिशिंग आणि स्टिचिंग हे तीन विभाग आहेत. प्रत्येक विभागात गारमेंट उत्पादकांचे काम होणार असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. एम्ब्रायडरी विभागात सात कोटी रुपयांची मशीन बसविली असून वर्षापूर्वी कामही सुरू झाले आहे. शिवाय वॉशिग व फिनिशिंग विभागात १.२५ कोटीं रुपयांची मशीन आली आहे. उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय पाच कोटी रुपयांची हायटेक स्टिचिंग मशीन (सिलाई) लवकरच येणार असल्याची माहिती आॅरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूरचे संचालक विपुल पंचमतिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.केंद्र सरकारची योजनाजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अशोक धर्माधिकारी यांनी सांगितले की, या क्लस्टरमुळे गारमेंट उद्योगाच्या विकासाला चालना मिळाली असून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, शिवाय छोटे गारमेंट उत्पादक एकाच छताखाली आले आहेत. हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने चालावा, याकरिता ‘गारमेंट क्लस्टर’ (समूह) स्थापनेला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नवीन व विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी छोटे उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे ते अत्याधुनिक मशीनचा उपयोग करू शकत नाही. शिवाय कपडे तयार करण्यासाठी लागणारी वेगळी यंत्रणाही त्यांच्याकडे नाही. गारमेंट उद्योगाच्या उभारणीसाठी नवे तंत्रज्ञान आणि मशीनरीची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी गारमेंट क्लस्टर उभारण्यात आले आहे. एखादा उद्योजक अत्याधुनिक मशीन घेण्यास इच्छुक असेल तर तेथील कामगारांना या क्लस्टरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे प्रत्येक उद्योगाला कुशल कामगार मिळेल, तसेच त्या उद्योगाची भरभराट होईल, असे धर्माधिकारी म्हणाले. कॅज्युअल शर्टचे उत्पादन शक्यवॉशिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने कॅज्युअल शर्टचे उत्पादन नागपुरात होत नाही. पण या क्लस्टरमध्ये हायटेक आणि फिनिशिंग मशीन उपलब्ध असल्यामुळे कॅज्युअल शर्टची निर्मिती आता नागपुरात करणे शक्य आहे. यामुळे गारमेंट व्यवसायात निश्चितच वाढ होणार आहे. पहिल्याच वर्षी ७० लाखांचे उत्पन्नगारमेंट क्लस्टरमधील एम्ब्रॉयडरी विभागाला जून २०१४ ते मार्च २०१५ या काळात बाहेरील गारमेंट उत्पादकांकडून कामाच्या मोबदल्यात ६० ते ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचा उपयोग कामगारांचे वेतन, वीज बिल आणि इतर कामांसाठी झाला आहे. पुढे तिन्ही विभागात विविध मशीनवर काम सुरू झाल्यास दरवर्षी दोन कोटींपेक्षा जास्त शुल्क गोळा होईल, शिवाय या क्षेत्रात गारमेंट उद्योगांची भरभराट होणार आहे.