शहरं
Join us  
Trending Stories
1
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
2
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
3
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
4
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
5
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
6
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
7
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
8
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
9
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
10
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
11
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
12
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
13
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
14
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
15
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
16
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
17
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
18
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
19
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
20
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार कोटींचा प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा

By admin | Updated: May 25, 2014 00:57 IST

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही.

निम्न पैनगंगा : तीनपैकी एकही कार्यकारी अभियंता नाही

विलास गावंडे - यवतमाळ

गोसीखुर्दनंतर विदर्भातील दुसरा मोठा निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प मनुष्यबळाअभावी दुबळा झाला आहे. सुमारे १५ हजार कोटींच्या या प्रकल्प कार्यालयात एकही कार्यकारी अभियंता नाही. परिणामी अनुषंगीक कामे लंगडी झाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ, चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातील शेतकर्‍यांसाठी लाभदायक असूनही या प्रकल्पाला पुरेसे मनुष्यबळ पुरविण्याबाबत शासन उदासीन आहे.

या प्रकल्पाला निधीच्या तरतुदीसोबतच आता मनुष्यबळाचा अडथळा निर्माण झाला आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून औद्योगिकरण, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, दळणवळण, कृषी उत्पादन आदी बाबींना चालना मिळून या क्षेत्राच्या विकासासह बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथे निर्माण केला जात आहे.

या विभागाचे यवतमाळ येथे एक आणि आर्णी येथे दोन विभाग आहेत. या तीनही कार्यालयांना पूर्ण वेळ कार्यकारी अभियंता नाही. तांत्रिक कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. शाखा अभियंत्यांची मंजूर पदांपैकी केवळ ५0 टक्के पदे भरण्यात आली आहे.

प्रत्यक्ष १२ ची गरज असताना केवळ सात उपविभागीय अभियंते आहेत. ५२ पैकी २६ शाखा अभियंते आहेत. निम्न पैनगंगा उपसा सिंचन विभाग आर्णी, पुनर्वसन विभाग आर्णी आणि निम्न पैनगंगा प्रकल्प यवतमाळ या तीनही ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रभारी आहे.

प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासून पुनर्वसनाच्यादृष्टीने अजूनही अधिसूचना काढली गेली नाही. या प्रकल्पामुळे ४६ गावे बाधित होणार असून ९६ गावांची शेतजमीन संपादित केली जाणार आहे. प्रकल्पातील काही अडथळे दूर झाले आहेत. यात वनखात्याची अंतिम मान्यता मिळाली आहे.

पुनर्वसन आराखडाही मंजूर करण्यात आला. हरित लवाद पुणेतर्फे अटींच्या अधीन राहून पर्यावरण मान्यता दिली आहे. केंद्रीय जल आयोगानेही प्राथमिक अहवालास तत्वत: मान्यता दिली आहे. एवढय़ा सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत प्रकल्पाला गती मिळण्याची आशा पल्लवीत होत असतानाच प्रशासनातील कामकाजासाठी मात्र मनुष्यबळ पुरविले जात नाही.