शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

१,४९६ कोटींची कन्हान नदी वळण योजनेच्या डीपीआरचे काम सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कन्हान नदी बोगदा वळण योजनेनंतर आता कन्हान वळण योजना हा नवा प्रकल्प आकारास येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कन्हान नदी बोगदा वळण योजनेनंतर आता कन्हान वळण योजना हा नवा प्रकल्प आकारास येत आहे. काटोल, नरखेड, सावनेर आणि कळमेश्वर तालुक्याचे भाग्य उजळणारा हा प्रकल्प १,४९६ कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पातून या चारही तालुक्यांतील १२,९१४ हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. मात्र सध्यातरी या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सुरू आहे.

गोदावरी पाणी तंटा लवादानुसार कन्हान नदीतील १५ टीसीएम पाणी महाराष्ट्राच्या वाट्याचे आहे. आंततराज्यीय नियोजनानुसार, यातील १५ टीसीएम पाण्यापैकी १० टीसीएम पाणी मध्यप्रदेशाच्या हद्दीतील जामघाट जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर नियंत्रित स्वरूपात १५ ऑक्टोबर ते ३० जून या काळात मिळणार आहे. उर्वरित ५ टीएमसी पाणी कन्हान जलविद्युत प्रकल्पाच्या खाली पण मध्यप्रदेशच्या हद्दीत कन्हानवर बॅरेज बांधून महाराष्ट्राला द्यायचे आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या क्षेत्रातील भूजलपातळी बरीच खोल आहे. या क्षेत्राची नोंद डार्क झोनमध्ये झाली आहे. पाण्याचा अन्य स्रोत उपलब्ध होण्यासारखा नसल्याने या भागाला अशा योजनांमधून पाणी देणे नितांत गरजेचे झाले आहे. या योजनेतून पाईपलाईनच्या माध्यमातून वितरण प्रणालीचे धोरण ठरले आहे.

...

जलसंधारण मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार

या प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात लवकरच बैठक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी पाटील नागपूर जिलह्याच्या दौऱ्यावर आले असता आढावा बैठकीत कन्हान नदी वळण सिंचन योजनेचा विषय चर्चेला आला होता. या कामाला प्राधान्य दिल्यास काटोल, नरखेड, कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासह पाणी सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. तसेच संत्रा उत्पादक क्षेत्रालाही याचा लाभ मिळणार आहे. सिंचनासाठी कायमस्वरूपी सुविधा निर्माण होणार असल्यामुळे ही योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याची व त्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.

...

अशी आहे योजना

१,४९६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात कन्हान नदीच्या कोची बॅरेजमधून पाणी लिफ्ट करून कोलार धरणात टाकले जाईल. या धरणाच्या साठ्यामधून तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाणी वितरण करून १२ हजार हेक्टर कृषी क्षेत्र सिंचित करण्याचे या योजनेत प्रस्तावित आहे. सिंचन आणि औद्यागिक वापर हा मुख्य उद्देश आहे. सिंचनासाठी ८६.०४८ द.ल.घ.मी. पाणी दिले जाणार असून यात काटोल तालुक्यासाठी ९०४ हेक्टर, नरखेड तालुक्यासाठी ९,१९६ हेक्टर, सावनेर तालुक्यासाठी २,०५३ हेक्टर आणि कळमेश्वर तालुक्यासाठी ७६१ हेक्टर असे एकूण १२,९१४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे.

...

असे असेल पाण्याचे नियोजन

एकूण पाणी वापर : ९२.२३ द.ल.घ.मी.

सिंचन वापर : ८६.०४८ द.ल.घ.मी.

पाणी पुरवठा योजना : ०.८९ द.ल.घ.मी.

औद्योगिक वापर : १.००० द.ल.घ.मी.

बाष्पीभवन व्यय : ४.२९६ द.ल.घ.मी.

...

कोलारची उंचा वाढणार

या प्रकल्पासाठी कोलार धरणाची उंची ७.५७ मीटरने वाढवावी लागणार आहे. यातून संचय पातळी ३७१.५७० मीटर होईल. या वाढीव पातळीत ९०.६६१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा निर्माण होणार आहे. कोलारचे सध्याचे मूळ बुडीत क्षेत्र ५८५ हेक्टर आहे. उंची वाढणार असल्याने या धरणासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.

...